Thursday, May 2, 2024
Homeजळगावदुकानं बंद, व्यवसाय सुरु

दुकानं बंद, व्यवसाय सुरु

जळगाव – Jalgaon :

करोनाचा वाढता प्रार्दूभाव बघता जिल्ह्यासह शहरात जिल्हाधिकार्‍यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहे.

- Advertisement -

मात्र, याकडे कानाडोळा करीत अनेकजण दुकानाचे शटर बंद करुन व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी शहरातील अशा तब्बल 16 दुकानांवर कारवाई करीत त्या दुकानांना सील ठोकले.

जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून त्यावर उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्व दुकाने, मार्केट बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

मात्र, शहरात अनेक दुकाने सुरु असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सकाळी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली संजय ठाकूर, नाना कोळी, किशोर सोनवणे, सुनील पवार, शेखर ठाकूर, राहुल पवार यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन पथकाने शहरातील भाटीया मार्केट, गोलाणी मार्केट, संत कंवरराम मार्केट आदी ठिकाणी पाहणी केली.

दरम्यान नियमांचे उल्लंघन करणार्‍या तब्बल 16 दुकानांवर सीलची कारवाई करण्यात आली असून नोटिसी बजावण्यात आल्या आहेत.

अर्धे शटर उघडून दुकाने सुरु

सोमवारी झालेल्या कारवाईत बहुसंख्य दुकाने कापड्याची होती. अर्धे शटर उघडून साडी, कापडे विक्री होत दुकाने सुरु होती. ग्राहक आल्यानंतर त्यास असून दुकानात प्रवेश देण्यात येत होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर उपायुक्त वाहुळे यांनी बंद शटर उघडल्यानंतर दुकाने 10 हून अधिक जण आढळून आले. अशा प्रकारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्यास मदत होऊ शकते म्हणून अशा दुकानांवर नोटीस बजावली असून खुलासा मागितला आहे.

या दुकानांवर झाली कारवाई

या मनपाच्या पथकाने संत कंवरराम मार्केटमधील अमित सिंथेटीक्स्, संत गोदडीवाला मार्केटमधील प्रकाश ड्रेसेस, भगवती कलेक्शन, जय सामाधा, कंवर कृपा गारमेंटस्, कंचन ड्रेसेस, महावीर गारमेंटस्, ब्युटी गारमेंटस्, विकास ड्रेसेस, माँ वैष्णवी गारमेंटस्, भाटीया मार्केटमधील जय वैष्णवी, श्रीराम होजिअरी, प्रेम प्लायवुड, अब्बासी हार्डवेअर, शिवबाबा शुज, चौधरी कॉम्प्लेक्समधील मास्टर फुट्स या दुकानांवर सीलची कारवाई केली.

जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून त्यावर उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्व दुकाने, मार्केट बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, शहरात अनेक दुकाने सुरु असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सकाळी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली संजय ठाकूर, नाना कोळी, किशोर सोनवणे, सुनील पवार, शेखर ठाकूर, राहुल पवार यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन पथकाने शहरातील भाटीया मार्केट, गोलाणी मार्केट, संत कंवरराम मार्केट आदी ठिकाणी पाहणी केली.

दरम्यान नियमांचे उल्लंघन करणार्‍या तब्बल 16 दुकानांवर सीलची कारवाई करण्यात आली असून नोटिसी बजावण्यात आल्या आहेत. अर्धे शटर उघडून दुकाने सुरु सोमवारी झालेल्या कारवाईत बहुसंख्य दुकाने कापड्याची होती. अर्धे शटर उघडून साडी, कापडे विक्री होत दुकाने सुरु होती. ग्राहक आल्यानंतर त्यास असून दुकानात प्रवेश देण्यात येत होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर उपायुक्त वाहुळे यांनी बंद शटर उघडल्यानंतर दुकाने 10 हून अधिक जण आढळून आले.

अशा प्रकारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्यास मदत होऊ शकते म्हणून अशा दुकानांवर नोटीस बजावली असून खुलासा मागितला आहे. या दुकानांवर झाली कारवाई या मनपाच्या पथकाने संत कंवरराम मार्केटमधील अमित सिंथेटीक्स्, संत गोदडीवाला मार्केटमधील प्रकाश ड्रेसेस, भगवती कलेक्शन, जय सामाधा, कंवर कृपा गारमेंटस्, कंचन ड्रेसेस, महावीर गारमेंटस्, ब्युटी गारमेंटस्, विकास ड्रेसेस, माँ वैष्णवी गारमेंटस्, भाटीया मार्केटमधील जय वैष्णवी, श्रीराम होजिअरी, प्रेम प्लायवुड, अब्बासी हार्डवेअर, शिवबाबा शुज, चौधरी कॉम्प्लेक्समधील मास्टर फुट्स या दुकानांवर सीलची कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या