Tuesday, December 3, 2024
Homeदेश विदेशShraddha Murder Case : आफताबची नार्को टेस्ट आज नाही, नेमकं काय घडलंय?

Shraddha Murder Case : आफताबची नार्को टेस्ट आज नाही, नेमकं काय घडलंय?

दिल्ली | Delhi

दिल्लीच्या महरौलीमध्ये श्रद्धा वालकरची हत्या झाली. हे प्रकरण उघड झाल्यानंतर अवघा देश सुन्न झाला. या हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. २६ वर्षीय श्रद्धाचा तिचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला (२८) याने गळा आवळून खून केला.

- Advertisement -

त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहाचे तब्बल ३५ तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आरोपी आफताब वारंवार खोटे बोलत असून पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे अफताब याची आज नार्को टेस्ट होणार असल्याची चर्चा होती. पण ही टेस्ट आज होणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

अफताबची नार्को टेस्ट होणार नसल्याचं या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. आफताबची नार्को चाचणी करण्याआधी पॉलिग्राफ चाचणी करण्याची आवश्यकता आहे. पण कोर्टाने अद्याप त्यासाठी परवानगी दिलेली नाही. या परवानग्या मिळण्यासाठी १० दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही परवानगी मिळेपर्यंत आफताबची नार्को चाचणी करता येणार नाही.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या