Friday, May 3, 2024
HomeजळगावVideo श्री खंडेराव महाराज यात्रा बारागाड्या उत्सव

Video श्री खंडेराव महाराज यात्रा बारागाड्या उत्सव

तरसोद, ता.जळगाव – jalgaon

जळगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र तरसोद (tarsod) येथे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराजांचा (Khanderao Maharaj) यात्रोत्सव दि.१४ एप्रिल रोजी उत्साहात पार पडला. यात्रोत्सवानिमित्त दरवर्षी प्रमाणे यंदाही बारागाड्या ओढण्यात आल्या. गेल्या दोन वर्षांपासून (corona) कोरोनामुळे यात्रोत्सवावर निर्बंध होते, यावेळी मात्र राज्य शासनाने (State government) निर्बंध शिथील केल्याने यात्रोत्सवाला रंगत आली.

- Advertisement -

बारागाड्यांचे पूजन सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, पो.उ.नि.राजेंद्र साळुंखे यांचेहस्ते करण्यात आले. बारागाड्या ओढण्याचा मान भैय्या रिक्षावाले यांना मिळाला होता. यात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी (nashirabad) नशिराबाद (police) पोलीस ठाण्याचे सपोनी श्री.मोरे, पो.नि.श्री.साळुंखे, पोलीस पाटील गोकुळ शिरूड, ग्रामसुरक्षादलाचे सर्व सहकारी, पो.कॉ.हेमंत मेटकरी, किरण बाविस्कर, श्री.गायकवाड, सरला देवरे, होमगार्ड अतुल थोरात यांनी चोख बंदोबस्त ठेवला. ग्रामस्थांचेही चांगले सहकार्य लाभले.

- Advertisment -

ताज्या बातम्या