नशिराबाद, ता.जळगाव – वार्ताहर Nashirabad
श्री संत शिरोमणी सावता महाराज (Sant Savata Maharaj) मंदिर, वरची आळी नशिराबाद येथे दि.२ नोव्हेंबर पासून अखंड हरिनाम किर्तन व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. आज दि. ९ रोजी सप्ताहाची सांगता दिंडी सोहळा, काल्याचे किर्तन व महाप्रसादाने होत आहे. दिंडी सोहळ्यात टाळ-मृदंगाचा निनाद, जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष, संत सावता महाराजांचा जयघोष करीत बाल वारकर्यांसह अबाल वृध्दांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला, डोळ्यांचे पारणे फेडणारा हा व्हिडीओ…