Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीक्षेत्र सराला बेट येथील दिंडीचे पंढरपूरकडे प्रतिकात्मक प्रस्थान

श्रीक्षेत्र सराला बेट येथील दिंडीचे पंढरपूरकडे प्रतिकात्मक प्रस्थान

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

सत्कर्मांनीच कर्म शुद्ध होऊन दु:ख दूर होऊ शकते, देव दयाळू नाही, तर न्यायी आहे हे विश्वातले कठोर सत्य आहे. भक्तीयोग आणि कर्मयोग वेगळा नाही, तर ते दोन्ही एकमेकांना परस्परपूरक आहेत. भक्तीद्वारे कर्म करण्याचे ज्ञान मिळते. सत्कर्मामुळेच भक्त देवास प्रिय होत असल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.

- Advertisement -

श्री क्षेत्र सराला बेट ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यास बेटात महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते समाधी पूजन करून प्रतिकात्मक प्रस्थान करण्यात आले.

यावेळी अशोक चे संचालक बबनराव मुठे, श्री क्षेत्र सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज यांच्यासह सराला बेटावरील मोजक्या भाविकांच्या उपस्थितित प्रतिकात्मक दिंडीचे प्रस्थान झाले.

दिंडी काढण्यास प्रशासनाची परवानगी नाही. करोनामुळे पंढरपुरातही दिंडीला परवानगी नाही. दिंडी काढता येत नाही, 200 वर्षाच्या दिंडीला खंड पडू नये, श्री श्रेत्र सराला बेटाला प्र्रदक्षिणा घालून ही दिंडी बेटावरच स्थिरावली. नियमाप्रमाणे दिंडी प्रस्थान केले.

आषाढी एकादशी पर्यंत ही पालखी भाविकांना दर्शनासाठी बेटातच ठेवण्यात येईल. आपआपल्या घरीच दिंडी उत्सव साजरा करायचा आहे. पंढरीच्या वारीला आपण पंढरापुरात जाऊ शकत नसाल त्यामुळे बेटात करोना चे पालन करत दर्शनासाठी या! असे आवाहन महंत रामगिरी महाराज यांनी केले.

सदगुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत भव्यदिव्यपणे साजरा होतो. परंतु करोनाच्या सावटामुळे मागील वर्षीही अखंड हरिनाम सप्ताह 50 भाविकांच्या उपस्थितीत बेटावरच साजरा केला. याही वर्षी सप्ताहाला बाहेर परवानगी नाही. याही वर्षी छोट्या स्वरुपात आपल्याला अखंड हरिनाम सप्ताह बेटावरच कमीत कमी लोकांमध्ये साजरा करावा लागेल. सप्ताहाच्या काही दिवस आगोदर याबाबत सांगितले जाईल. असेही महंत रामगिरी महाराज यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या