Friday, May 3, 2024
Homeजळगावधानोर्‍यात ‘श्री’ विसर्जन मिरवणुकीला गालबोट

धानोर्‍यात ‘श्री’ विसर्जन मिरवणुकीला गालबोट

धानोरा, Dhanora ता.चोपडा ।

धानोर्‍यात पाच दिवसांची गणेश विसर्जन मिरवणूक (‘Shri’ Visarjan) शांततेत सुरू असतांना सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी (Assistant Police Inspectors) वेळेच्या नावाखाली (name of time) मिरवणुकीत (procession) चक्क लाठीचार्ज (Pretty lathi charge) केल्याने विसर्जन मिरवणुकीला (Immersion procession) गालबोट (Cheeky) लागले. त्यामुळे संतप्त गणेशभक्तांनी ठिय्या आंदोलन (Ganesha devotees protested) सुरु केले. वाद विकोपाला गेल्याने विसर्जन मिरवणुका रात्री 11 वाजता जागेवरच थांबविण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत यावर तोडगा निघालेला नव्हता. त्यामुळे ठिय्या आंदोलन सुरुच होते.

- Advertisement -

याबाबत सविस्तर असे की,दि ४ रोजी दुपारी गणेश विसर्जन सुरु झाली होती.यात सुरुवातीपासुन सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण दांडगे यांनी दडपशाही चे धोरण अवलंबत पाच तरुणांना किरकोळ कारणांवरुन पोलिस गाडीत बंद करुन ठेवले होते.यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी होती.पुढे रात्री दहा वाजता मिरवणुक ही मशिद जवळुन जात असतांना दोन मंडळ पार झाली होती.

तिसरे मंडळ ओम गणेश मंडळ जात असतांना वाजंत्री अचानक बंद करा असा नियम आहे असे सांगितले असता गणेशभक्त नाराज झालेत. काही गणेशमंडळांनी जागेवरच ठिय्या मांडला.यामुळे संतापलेल्या दांडगे यांनी सहका-यांना सांगून सर्वांवर दडपशाही केली.यात पूर्ण गावात पळापळ झाली,सर्वत्र अशांतता माजली.यामध्ये काही गणेशभक्त जखमी झालेत,दोन फोर व्हिलर चे काचा फुटल्या,मोटारसायकल चेही नुकसान झालेत.याउलट ग्रामस्थांनीही संतापात पोलिसांवर किरकोळ दगडफेक केली.

यामुळे पोलिसांनी रात्री साडेदहा वाजता गावातुन काढता पाय घेतला.गावातील मिरवणुक थांबलेली असुन सपोनि दांडगे यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत मिरवणुक पुढे जाणार नाही असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. प्रशासन पुढे काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या