Sunday, November 24, 2024
HomeनगरShrigonda Assembly Election : शरद पवार गटाचा श्रीगोंदा मतदारसंघात उमेदवार फायनल?

Shrigonda Assembly Election : शरद पवार गटाचा श्रीगोंदा मतदारसंघात उमेदवार फायनल?

श्रीगोंदा | प्रतिनिधी

येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. अहमदनगर जिल्ह्यातही असंच वातावरण पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून येत्या निवडणुकांच्या अनुषंगाने जय्यत तयारी सुरू आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात देखील आता राजकीय नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी महायुतीमध्ये अनेकजण इच्छुक आहेत. याच दरम्यान श्रीगोंदा कुकडी सहकारी साखर कारखाना चेअरमन माजी आमदार राहुल जगताप यांनी यांनी आज माळेगावमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज शरद सभागृह येथे शेकडो कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ घेऊन राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.

हे हि वाचा : सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत YouTube चॅनल हॅक, मध्येच सुरू झाला भलताच व्हिडीओ

श्रीगोंदा मतदारसंघात राहुल जगताप हेच उमेदवार असतील. त्यांना कामाला लागा असे सांगत नगर जिल्ह्यातील आठ जागा राष्ट्रवादी लढणार असून त्यात श्रीगोंदा जागा ही राष्ट्रवादीचीच असल्याचे घोषित केले असल्याचा दावा शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी शरद पवार यांनी राहुल जगताप यांना कामाला लागा अस सांगत आता आणलेली साकळाई आणि कुकडी बोगद्याचा प्रश्नांच निवेदन न देता हे प्रश्न आमदार होऊनच सोडवा असे असल्याचा दावाही शिष्टमंडळातील कार्यकर्त्यांनी केला आहे.

तसेच, मध्यंतरी संजय राऊत यांनी श्रीगोंदा मध्ये शिवसेना उमेदवारी घोषित केली होती. मात्र महाविकास आघाडीतील तीन पक्ष मिळवू उमेदवार ठरवणार असल्याने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकट्याने उमेदवारी घोषित करणे बरोबर नाही असे ही शरद पवार यांनी सांगितले असल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले.

हे हि वाचा : पार्किंगच्या जागेवरुन वाद, महिलेला दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण

२०१९ ची विधानसभा निवडणूक श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ हा अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अटीतटीची लढत झाल्याचं श्रीगोंदा तालुक्यात दिसलं (Maharashtra Politics) होतं. भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते १,०३,२५८ मतांनी विजयी झाले होते. तर राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम प्रतापराव शेलार यांना ४,७५० मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

श्रीगोंदा तालुक्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीचा सामना रंगला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार राहुल जगताप ९९,२८१ मतांनी विजयी झाले होते. तर भाजपचे बबनराव पाचपुते १३,६३७ मतांनी पराभूत झाले होते. परंतु २०१९ मध्ये भाजपने बाजी पलटली होती. आता नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याचा अंदाज आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या