Sunday, May 19, 2024
Homeनगरकांद्याचा एकच ट्रक फिरून एकाच आडतीवर चार चार वेळा आणला

कांद्याचा एकच ट्रक फिरून एकाच आडतीवर चार चार वेळा आणला

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

शासनाने कांदा अनुदान जाहीर करताच या काळात बोगस शेतकरी दाखवून अनुदान लाटण्यासाठी व्यापार्‍यांनी विविध कृलुप्त्या लढवल्या. एकच ट्रक चार चार वेळा त्याच आडतीवर फिरून फिरून दिवसभरात चार चार वेळा आला आणि नंतर शेवट दुसर्‍याच जवळच्या मार्केटला कांद्याची विक्री करण्यात आली. त्यातही बोगस नाव दाखवून अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न झाल्याची माहिती काही व्यापार्‍यांनी नाव न छापण्याच्या बोलीवर सांगितली.

- Advertisement -

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासन काळात कांदा अनुदान घोटाळा झाला यात चार ते पाच व्यापारी आणि सचिव यांनी दोन कोटी 98 लाख रुपयांच्या अनुदानाचे बोगस अर्ज केले असल्याने याची चौकशी सुरू आहे. विशेष लेखापरीक्षक यांच्या देखरेखीखाली श्रीगोंद्यात दोन दिवस चौकशी आणि दप्तर तपासणी झाली आहे. अजून चौकशी सुरू आहे आणि त्यानंतर त्याचा चौकशी अहवाल जिल्हा उपनिबंधक याच्याकडे जाणार असून पुढील निर्णय होणार आहे.

तपासणी दरम्यान बाजार समितीत संबंधित व्यापारी यांची चौकशी समितीने केली तसेच मापाडी यांचे म्हणणे घेतले आहे. त्यात मापाड्यांनी रोजचे काम संपल्यानंतर काटा पट्टी पुस्तक कार्यालयात जमा केले होते. या पुस्तकात मापाड्याच्या परस्पर केलेल्या पावत्या या कुणी आणि कशा केल्या. त्यांना पावती पुस्तक कशी उपलब्ध झाली. हा चौकशी आणि तपासाचा भाग आहे. परंतु सध्या बाजार समिती आवारात आणि संबंधित यांच्यात सुरू असलेल्या दबक्या आवाजातील चर्चा बाहेर येत आहेत.

यात बोगस कांदा अनुदान प्रकरणात अर्ज दाखल करताना आपल्या जवळचे अर्ज दाखल करा अशी ऑफर ही देण्यात आली पण ती ही पटली नसल्याने व्यापारी यापासून दूरच राहिले.त्यात शेतकर्‍यांना किती द्यायचे, स्वत: किती आणि नंतर पुढे किती द्यायचे यापेक्षा यापासून लांब राहिलेले काही जण आता या प्रकरणापासून दूर राहिल्याचे सांगत आहेत.

साठ-चाळीस फॉर्म्युला

कांदा आडत व्यापारी यांच्या व्यतिरिक्तही काही व्यापार्‍यांना बोगस अनुदान अर्ज करण्याबाबत संबंधितांनी ऑफरही दिली होती. परंतु साठ-चाळीस आणि नंतर पन्नास-पन्नास टक्केचा फॉर्म्युला देण्यात आल्याचे काही व्यापार्‍यांच्या चर्चेतून समोर येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या