Saturday, September 28, 2024
HomeनाशिकNashik Dindori News : कादवाला ६.३२ कोटींचा नफा - शेटे

Nashik Dindori News : कादवाला ६.३२ कोटींचा नफा – शेटे

वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा; गाळप वाढवण्यावर भर

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याने (Kadwa Cooperative Sugar Factory) अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करत असताना विस्तारीकरण इथेनॉल प्रकल्पाचे कर्ज हप्ते वेळेत परतफेड केली असून कारखान्यावर कोणतेही थकीत कर्ज नाही.कारखान्याने ऊस बिला पोटी संपूर्ण एफ आर पी अदा केले असून गेल्या आर्थिक वर्षात कादवा ला ६ कोटी बत्तीस लाख त्रेपन हजार रुपयांचा भरघोस नफा झाला असून कारखान्याचे अधिक भरभराटीसाठी जास्तीत जास्त उस गाळप होणे अत्यावश्यक आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी असे आवाहन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे (Shriram Shete) यांनी केले.

- Advertisement -

हे देखील वाचा : नाशिकमध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पाचे आज लोकार्पण

कादवा सहकारी साखर कारखान्याची ५३ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन श्रीराम शेटे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,खासदार भास्कर भगरे, माजी आमदार रामदास चारोस्कर, जिल्हा बँकेचे माजी संचालक गणपतराव पाटील, बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, उपसभापती योगेश बर्डे,कैलास मवाळ,शिवसेनेचे सुनील पाटील, कादवाचे माजी संचालक शिवाजीराव जाधव, सुरेश डोखळे, सचिन बर्डे,प्रकाश शिंदे,चांदवड बाजार समितीचे सभापती संजय जाधव, विलास कड आदीसह सर्व संचालक व मान्यवर उपस्थित होते.

हे देखील वाचा : Nashik Niphad News : खराब रस्त्यामुळे कांद्याने भरलेला ट्रॅक्टर पलटी; शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान

पुढे बोलताना श्रीराम शेटे यांनी गेल्या वर्षी इथेनॉल वर निर्बंध आल्याने अपेक्षित फायदा झाला नाही मात्र केंद्र सरकारने (Central Government) या वर्षी इथेनॉल ला परवानगी दिल्याबद्दल आभार मानले. कारखान्याने कर्जाचे हप्ते वेळेत भरले असून कोणतेही कर्ज थकीत नाही. आता कमी दिवसात जास्तीत जास्त गाळप होणे गरजेचे असून त्यासाठी गाळप क्षमता वाढविणे गरजेचे आहे, त्यासाठी परवानग्या घेवून ठेवल्या आहे, त्यासाठी ऊस लागवड वाढण्याची गरज आहे. भविष्याचा वेध घेत विविध उपपदार्थ निर्मितीचे प्रयत्न सुरू असून इथेनॉल (Ethanol) प्रकल्प कार्यान्वित झाले असून त्या सोबतच सीएनजी सिबीसी हायड्रोजन पोटॅश निर्मिती प्रस्तावित आहे मात्र पूर्ण अभ्यास करूनच हे निर्णय घेतले जातील असे श्रीराम शेटे यांनी सांगितले. यावेळी सचिन बर्डे ,सुरेश डोखळे यांनी २००० चे आतील शेअर्स जमा करण्याचे धोरणास विरोध करत विविध प्रश्न उपस्थित केले.

हे देखील वाचा : युवा शेतकऱ्याला ‘आदर्श डाळिंब उत्पादक शेतकरी पुरस्कार’

दरम्यान, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, संपतराव कावळे, हिरामण पाटील, सुभाष मातेरे, तानाजी पगार, संपत कोंड, गंगाधर निखाडे, शिवानंद संधान, आदींनी चर्चेत भाग घेतला. चेअरमन श्रीराम शेटे यांनी सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. स्वागत संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले, सूत्रसंचालन अशोक शिंदे तर आभार संचालक सुकदेव जाधव यांनी मानले. यावेळी सभासद अधिकारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा : ‘माझी वसुंधरा’ अभियानात नाशिक जिल्ह्याला तब्बल १५ बक्षिसे जाहीर; ७.५ कोटींच्या बक्षिसांची लयलूट

शेतकऱ्यांचा सन्मान

कादवा सहकारी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात सर्वाधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला, यात खेडगाव येथील पांडुरंग शेटे,मोहाडी येथील कृष्णा पाटील, सुभाष सोमवंशी, अवनखेड येथील चिंतामण जाधव, मावडी येथील गोरख घुले, पिपळद येथील विजय लोंढे, चिंचखेड येथील दौलत संधान, चंद्रकला फुगट, मंजुळा फुगट, लखमापूर येथील संदीप दळवी, पाडे येथील शंकर नाठे, मडकीजांब येथील विठ्ठल ढुमने, करंजवन विलास जाधव कर्मचारी वर्गातून बापू शिंदे आदींचा सन्मान करण्यात आला, तसेच महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार नरहरी झिरवाळ यांचा तसेच खासदार भास्कर भगरे यांचा कारखान्या तर्फे सत्कार करण्यात आला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या