श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
गुरूवारी श्रीरामपूर बाजार समितीमध्ये (Shrirampur Market Committee) झालेल्या लिलावात लुज कांद्याची (Onion) 63 वाहने दाखल झाली. यामध्ये नंबर 1 कांद्याला (Onion) 1400 ते 1600 भाव मिळाला. नंबर 2 कांद्याला 1100 ते 1350 तर नंबर 3 कांद्याला (Onion) 630 ते 950 रुपये, गोल्टीला 1100 ते 1400 रुपये दर मिळाला.
तसेच बाजार समितीमध्ये बटाटा (230 क्विंटल) आवक होवून 800 ते 1500 रुपयांपर्यंत भाव मिळाला, आले (18 क्विंटल) 1200 ते 2500, कोबी (23 क्विंटल) 300 ते 500, फ्लावर (22 क्विंटल) 400 ते 600, हिरवी मिरची (16 क्विंटल) 3500 ते 4200, चिंच (210 क्विंटल) 1500 ते 5400, टरबूज (34 क्विंटल) 700 ते 1200, खरबूज (23 क्विंटल) 1500 ते 2500, मेथी (3300) जुडी 500 ते 1100 रुपये शेकडा भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती सुधीर नवले व सचिव साहेबराव वाबळे यांनी दिली.
वांबोरीत कांदा 1600 रुपये
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
गुरूवार दिनांक 13 मार्च रोजी वांबोरी उपबाजारात झालेल्या कांदा लिलावात 2 हजार 658 कांदा गोण्याची आवक झाली. एक नंबरचा कांदा 1 हजार 205 रुपये ते 1 हजार 600 रुपये, दोन नंबरचा कांदा 605 रुपये ते 1 हजार 200 रुपये तर तीन नंबरचा कांदा 200 रुपये ते 600 रुपये भावाने विकला गेला.
तसेच गोल्टी कांद्याला 700 रुपये ते 1 हजार 100 रुपये भाव मिळाला. अपवादात्मक 28 कांदा गोण्यांना 1 हजार 700 रुपये भाव मिळाला. भुसार मालात गहु 2 हजार 350 रुपये ते 2 हजार 560 रुपये, हरभरा 5 हजार 154 रुपये ते 5 हजार 200 रुपये तर तुर 6 हजार 101 रुपये याप्रमाणे भाव मिळाले.