Friday, November 15, 2024
Homeराजकीयश्रीरामपूर भाजप पदाधिकारी निवडी नियमबाह्य

श्रीरामपूर भाजप पदाधिकारी निवडी नियमबाह्य

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

जनतेत कुठलेही काम न करता, कुठलाही जनाधार नसणारी मंडळी नेतृत्वाच्या पुढे पुढे करून पदे पटकाविणार्‍या

- Advertisement -

व पक्षाच्या माध्यमातून विविध पदांचा लाभ घेतलेल्या व्यक्तीलाच पुन्हा संधी मिळाली. या घटनेच्या विरोधात संघटनेत प्रचंड असंतोष आहे. चळवळीत काम करणार्‍यांना व संघर्ष करणार्‍या कार्यकर्त्याला या मंडळाच्या निवडीत डावललेले आहे.

त्यामुळे पुढील दिशा ठरविण्यासाठी लवकरच सर्व बुथ प्रमुखांची व शक्तीकेंद्र प्रमुखांची बैठक घेऊन निर्णय घेऊ,अशी माहिती सचिन ढोबळे, बाळासाहेब हिवराळे व सोमनाथ कदम यांनी गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, तालुक्यातील दोन्ही मंडलांचे मंडलाध्यक्ष निवडताना बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुखांना कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलेले नाही, दैनंदिन कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांच्या मनाविरुद्ध या निवडी झालेल्या आहेत. या निवडी पक्ष नियमाप्रमाणे झालेल्या नाहीत.

श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचे शक्ती केंद्र प्रमुख व बुथ प्रमुखांचे संघटन उभे राहिले. या संघटनेने मागील 5 वर्षांत तळागाळातील गोरगरिब जनतेची रात्रंदिवस मेहनत करून अनेक कामे मार्गी लावली व पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचवले. ज्या संघटनेने पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचले. त्या संघटनेला विश्वासात न घेता हा निर्णय झाला असून याची मोठी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाच्या काम करणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

श्रीरामपूर मंडल अध्यक्षांच्या निवडी पक्षाच्या घटनेप्रमाणे सर्व बुथ प्रमुखांना विचारून व निवड प्रक्रिया राबवून होणे गरजेचे होते. श्रीरामपूर तालुक्यातील जाहीर झालेल्या मंडल अध्यक्षांच्या निवडी या नियमबाह्य असून तळागाळात काम करणार्‍या पक्षाच्या संघटनेच्या विरोधात झालेल्या असल्याने बुथ प्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुख यांना मान्य नाही.

श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात एकूण 310 बूथ प्रमुख आहेत.या सर्वांचे मत विचारात घेऊन निवड व्हायला हवी होती. मात्र ती झाली नाही. येत्या एकदोन दिवसांत बूथ प्रमुखांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवण्याचे त्यांनी जाहीर केले असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

आमची निवड नियमबाह्य नाही

याबाबत नवनियुक्त तालुकाध्यक्ष बबन मुठे व शहराध्यक्ष मारुती बिंगले यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही यापूर्वी पदाधिकारी असतांना व भाऊसाहेब वाकचौरे उमेदवार असताना दोन नंबरची मते मिळवून दिली.आमच्याच काळात पक्षही वाढला. पक्ष वाढीसाठी आमचे यापूर्वीचे काम पाहून पक्षाची कोअर समिती व वरिष्ठ नेते माजी विरोधी पक्षनेते आ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, विजय पुराणिक, किशोर साळकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्यात आमच्या नावावर एकमत झाले व आमची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षातील सर्व मतभेद मिटवून सर्वांना एकत्रित करून काम करणार असल्याचे मुठे व बिंगले यांनी सांगून ज्यांनी राजीनामे दिले आहेत त्यांनी निष्फळ आरोप करू नयेत असा टोलाही मारला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या