Sunday, May 19, 2024
Homeनगरपहिल्या पावसातच श्रीरामपूरचे रस्ते उखडले

पहिल्या पावसातच श्रीरामपूरचे रस्ते उखडले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नगरपरिषद हद्दीत लाखो रुपये खर्चून नुकतेच केलेल्या नेवासा रस्त्याला पहिल्याच पावसात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्याला पडलेले खड्डे घाईघाईने बुजवून ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट कामावर भर पावसात पांघरूण घालण्याचे काम पालिका प्रशासन व पदाधिकारी करत असल्याचा आरोप राजेश बोरुडे यांनी केला आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर शहरात अलीकडच्या काळात अनेक मुख्य, अंतर्गत रस्त्यांची झालेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून, पहिल्याच पावसात रस्त्यांची गुणवत्ता दिसू लागली आहे. ठेकेदार निकृष्ट कामे करत आहेत. पालिका प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालत आहे. काही दिवसांपूर्वीच केलेल्या शिवाजी चौकापासून पश्चिमेकडे नॉर्दन ब्रँच कॅनॉल पुलापावेतोच्या रस्त्याचेही अतिशय निकृष्ट काम करण्यात आले असून, यात कच्ची ठिसूर, बादड खडी वापरण्यात आली आहे.

पालिका प्रशासनाकडे याबाबत तक्रार करून ठेकेदारावर कोणतीही कारवाई झालेली नाही. सुमारे 53 लाख 94 हजार 680 रुपयांचे हे काम असून, खराब मटेरियल वापरून दर्जाहीन काम केले आहे. या कामात मोठ्या प्रमाणात गडबड झाली असल्याचा संशय बोरुडे यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या