Sunday, May 19, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यात नवीन 320 करोनाबाधित

श्रीरामपूर तालुक्यात नवीन 320 करोनाबाधित

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल 320 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. काल 1376 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 142 होती.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयात 02, खासगी रुग्णालयात 279 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 39 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 13978 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 12408 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

काल शहरातील वॉर्ड नं. 1-19, वॉर्ड नं. 2-04, वॉर्ड नं. 3-01, वॉर्ड नं. 4-01, वॉर्ड नं. 6-01 तर वॉर्ड नं. 7-18असे शहरात 58 रुग्ण आहेत. तर ग्रामीण भागात बेलापूर-22 ऐनतपूर-03, बेलापूर खुर्द-04, उक्कलगाव-11, गळनिंब-07, कडीत बुद्रुक-02, कडीत खुर्द-01, पढेगाव-11, मालुंजा-06, लाडगाव-01, कान्हेगाव-01, मातापूर-08, उंबरगाव-03, भेर्डापूर-05, कारेगाव-14, टाकळीभान-11, भोकर-06, घुमनदेव-03, वांगी बुद्रुक-01, गुजरवाडी-01, उंदिरगाव-11, बाम्हणगाव-03, माळेवाडी-37, निमगाव खैरी-05, गोंधवणी-12, दत्तनगर-04, खंडाळा-01, शिरसगाव-13, जाफराबाद-01, गोंडेगाव-04, माळवाडगाव-16, भामाठाण-03, खोकर-04, मुठेवाडगाव-05, वडाळामहादेव-06, निपाणीवडगाव-05, अशोकनगर-02 असे एकूण 256 रुग्ण आहेत.

काल तालुक्यात करोनाबाधित रुग्णांनी डोके वर काढल्यामुळे पुन्हा नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. त्याचबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही कमी झाल्याने अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे करोना रुग्णांचा रेशो रेट आपोआपच वाढला गेला आहे. काल केवळ 142 रुग्णांनी डिस्चार्ज घेतला आहे. त्यामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण हे 1376 आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या