Thursday, May 2, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यात 15 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात 15 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात काल केवळ 15 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive patient) आढळून आले आहेत. काल 130 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह (Active Patient) असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेवून बरे झालेल्यांची संख्या काल 08 होती.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयात 01 खासगी रुग्णालयात 10 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 04 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 15600 रुग्णांना करोनाची लागण (Covid 19 ) झाली होती. तर त्यातील सुमारे 15470 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 1-01, वॉर्ड नं. 2-01, वॉर्ड नं. 3-01, वॉर्ड नं. 7-01 असे 04 तर ग्रामीण भागात बेलापूर-02, बेलापूर खुर्द-01, उक्कलगाव-02, मुठेवाडगाव-03 असे 08 रुग्ण आहेत.

श्रीरामपूर शहरात केवळ 04 रुग्ण असून ग्रामीण भागात 08 तर ज्या रुग्णाचे नाव, मोबाईल नंबर व पत्ता चुकीचा आहे असा 03 रुग्ण असून श्रीरामपूर तालुक्यात असे एकूण केवळ 15 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या