Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यात 118 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह; 12 करोनाबाधित; 22 रुग्णांना डिस्चार्ज

श्रीरामपूर तालुक्यात 118 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह; 12 करोनाबाधित; 22 रुग्णांना डिस्चार्ज

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur) काल केवळ 12 करोनाबाधित रुग्ण (Corona Positive Patient) आढळून आले आहेत. 118 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या काल 22 होती.

- Advertisement -

खासगी रुग्णालयात 03 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 09 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 15684 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. त्यातील सुमारे 15566 रुग्णांनी करोनावर मात केली (Defeated Corona) आहे.

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 1-02 वॉर्ड नं. 4-01, वॉर्ड नं. 7-01 असे 4 तर ग्रामीण भागात गळनिंब-03, मालुंजा-01, निमगाव खैरी-01, शिरसगाव-01, नायगाव-01, असे 08 रुग्ण आहेत.श्रीरामपूर शहरात केवळ 04 रुग्ण तर ग्रामीण भागात 08 तर ज्या रुग्णाचे नाव, मोबाईल नंबर व पत्ता चुकीचा आहे असे 03 रुग्ण असून श्रीरामपूर तालुक्यात असे एकूण केवळ 16 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या