Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यात 283 करोनाबाधितांची भर

श्रीरामपूर तालुक्यात 283 करोनाबाधितांची भर

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल पुन्हा करोनाने डोके वर काढले असून काल तालुक्यात नवीन 283 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. 1295 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. 108 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालयात 40 खासगी रुग्णालयात 230 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 13 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 7360 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 4989 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

यात श्रीरामपूर शहरात 91 तर ग्रामीण भागात 164 रुग्ण असे 255 तर 28 रुग्ण अन्य तालुक्यातील तसेच पूर्ण नाव नसलेले व मोबाईल नंबर चुकीचा दिलेले रुग्ण असून असे 283 रुग्ण आहेत.

शहरात वॉर्ड नं. 1-26, वॉर्ड नं. 2-03, वॉर्ड नं. 4-04 वॉर्ड नं. 5-10, वॉर्ड नं. 6-17, वॉर्ड नं. 7-32 असे 91 तर ग्रामीण भागात बेलापूर-30, ऐनतपूर-02, नरसाळी-03, एकलहरे-01, उक्कलगाव-10, गळनिंब-04, कुरणपूर-01, फत्याबाद-01, कडीत बुद्रुक-01, पढेगाव-08, मालुंजा-01, लाडगाव-01, कान्हेगाव-01, भेर्डापूर-03, कारेगाव-08, मातापूर-02, उंबरगाव-09, वळदगाव-03, टाकळीभान-05, भोकर-05, कमालपूर-01,घुमनदेव-01, खिर्डी-03, उंदिरगाव-06, हरेगाव-05, गोवर्धन02, महांकाळवाडगाव-01, निमगावखैरी-03, गोंधवणी-07, खंडाळा-11, शिरसगाव-08, गोंडेगाव-04, माळवाडगाव-03, खोकर-01, वडाळा महादेव-04, अशोकनगर-05 असे एकूण 164 तर अन्य तालुक्यातील 28 रुग्ण यात पूर्ण नाव नसलेले व मोबाईल नंबर चुकीचा दिलेले रुग्ण आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या