Wednesday, January 7, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपुरात पोलिसांनी ड्रग सदृश पावडर पकडली

Shrirampur : श्रीरामपुरात पोलिसांनी ड्रग सदृश पावडर पकडली

एमआयडीसीमधील गोदामातून घेतलेल्या 21 गोण्या पावडरसह टेम्पो ताब्यात

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

येथील एमआयडीसीमधील एका गोदामातून 21 गोण्या पांढर्‍या रंगाची पावडर व खडे घेवून निघालेला टेम्पो स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपूर शहर पोलिसांनी दिघी शिवारात पकडला. ही ड्रग सदृश पावडर असून फॉरेन्सिक तपासणीसाठी या पावडरचे नमुने पोलिसांनी घेतले आहेत. काल बुधवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. श्रीरामपूर येथील एमआयडीमधून एक टेम्पो ड्रग सदृश पावडर घेवून जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना समजली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी श्रीरामपूर शहर पोलीस तसेच पोलीस उपाधिक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांना माहिती दिली.

- Advertisement -

दिघी शिवारात एक टेम्पो (क्र.एम एच-20 बी टी 0951) पोलिसांनी पकडला. त्यात 20 गोण्या पांढरा रंग असलेली पावडर व काही खडे आढळून आले. टेम्पो चालकास ही पावडर कोठून आणली याची माहिती विचारली असता त्याने श्रीरामपूर एमआयडीसी मधील गोदामातून हा माल उचलल्याची माहिती दिली. दौंड (जि.पुणे) येथील एका कंपनीमध्ये काही महिन्यांपूर्वी नोकरीस असलेल्या दौंड येथील तरुणाने नोकरी सोडून चार महिन्यापूर्वी श्रीरामपूर एमआयडीसी मध्ये भाड्याने घेतलेल्या गोदामातून ही पावडर उचलण्यात आली आहे. या कारवाईत पकडलेला टेम्पो या तरुणाच्या . धनगरवाडी, ता. राहाता, जि. अहिल्यानगर येथील मामाच्या मुलाच्या मालकीचा आहे.

YouTube video player

दरम्यान घटनास्थळी अपर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे व पोलिस उपाधिक्षक डॉ. शिवपुजे यांनी भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत या गोडावूनचे कुलूप तोडून गोडावूनची तपासणी करण्यात आली. मात्र तेथे काय सापडले याची माहिती उपलब्ध होवू शकली नाही. या कारवाईत पकडलेली ही ड्रग सदृस्य पावडर फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून त्यासाठी या पावडरचे नमुने पोलिसांनी घेतले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच ही पावडर नेमकी कशाची याचा उलगडा होणार आहे. ही ड्रग असेल तर त्याचे तेलंगणाशी काही कनेक्शन आहे का? याचाही शोध पोलिस घेत आहेत.

ताज्या बातम्या

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा- राज्य निवडणूक आयुक्तांचे...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सर्वांचे वेळेत प्रशिक्षणही पूर्ण झाले पाहिजे; तसेच...