Sunday, November 17, 2024
Homeराजकीयश्रीरामपूर काँग्रेसचा बालेकिल्ला कायमच राहणार - आ. तांबे

श्रीरामपूर काँग्रेसचा बालेकिल्ला कायमच राहणार – आ. तांबे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

काँग्रेेसची विचारधारा श्रीरामपूर तालुक्याने कायमच जपून ठेवली आहे. त्यामुळेच आजपर्यंत काँग्रेसने श्रीरामपूर विधानसभेत आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.

- Advertisement -

त्याचमुळे काल श्रीरामपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे आणि यापुढेही कायमच राहणार असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ. सुधीर तांबे यांनी केले.

काँगे्रेस कमिटीचे अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गाव तेथे काँग्रेस अभियान सुरू असून यासंदर्भात श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आ. डॉ. सुधीर तांबे होते.

यावेळी आ. लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, कॉँग्रेस प्रदेश महासचिव उपनगराध्यक्ष करण ससाणे, काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे, ज्येष्ठ नेते जी. के. पाटील, इंद्रनाथ पा. थोरात, तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक, शहराध्यक्ष संजय छल्लारे, जि. प. सदस्य बाबासाहेब दिघे, मार्केट कमिटीचे संचालक सचिन गुजर, सुधीर नवले, पंचायत समिती सदस्या डॉ. वदंना मुरकुटे, विजय शिंदे, अंकुश कानडे, मुरली राऊत, बाबासाहेब कोळसे, अ‍ॅड. समिन बागवान, सुभाष तोरणे, दिलीप सानप, कार्लस साठे आदी उपस्थित होते.

आ. डॉ. तांबे म्हणाले की, कोणताही राजकीय वारसा नसताना स्व. ससाणे यांनी श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेस जिवंत ठेवली. पक्षात गट-तट असतील तर त्यांना एकत्र आणण्याचे काम त्यांनी केल्यामुळे काँग्रेस मजबूत राहिली.

काँग्रेस जेव्हा संकटात होती त्यावेळी सर्वजण सोडून गेले मात्र त्याच कठीण काळात राज्यात काँग्रेेसची धुरा ना. बाळासाहेब थोरात यांच्या खांद्यावर ठेवली आणि त्याच काळात श्रीरामपुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्यापाठिशी खंबीरपणे उभे राहून काँग्रेसला यश मिळवून देण्यात मोठा वाटा राहिला असल्याचे त्यांनी सांगितले.

आ. लहू कानडे म्हणाले, राज्यात विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडवून आणण्यात ना. बाळासाहेब थोरात यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. काँगे्रस पक्ष हा नवीन विचारधारा घेऊन चालणारा पक्ष आहे. जोपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्ता निर्णयप्रक्रियेत येत नाही तोपर्यंत पक्षाला यश मिळणार नाही. कठीण काळात याच कार्यकर्त्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी पाठबळ दिले. गाव तेथे शाखा करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित काम करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके म्हणाले, यापुढे काँग्रेस पक्ष मजबूत करायचा असेल तर प्रत्येक गावात भागाभागात विविध ठिकाणी गट तयार करून प्रत्येक गटावर जबाबदारी टाकून काम केले तर आपल्यावरील जबाबदारीचे ओझे कमी होऊन आपल्याला काम करण्यास वेळ मिळून पक्षाचे संघटन वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले, श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत काँग्रेसचे पाठबळ चांगले राहिले आहे. यापुढे पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी गाव तेथे काँग्रेस पक्ष स्थापन करणार आहोत. यासाठी भविष्यात सर्वसामान्यांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेस समन्वयक ज्ञानदेव वाफारे, काँग्रेस शहराध्यक्ष संजय छल्लारे, तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक, डॉ. वंदना मुरकुटे, इंद्रनाथ पा. थोरात, सचिन गुजर, कार्लस साठे यांनी आपली मनोगत व्यक्त केले.

करण ससाणेंना चांगल्या जागी बसवा

कठीण काळात काँग्रेसची साथ न सोडता पक्षाशी एकनिष्ठ राहून ना. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण ससाणे श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेसचे काम करून काँग्रेसचा आमदार निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यावेळी ना. थोरात यांनी करण ससाणे यांची चांगल्या पदावर वर्णी करू, असे आश्वासन दिले होते. याची आठवण संजय छल्लारे यांनी करून देत करण ससाणे यांना एखादे चांगले पद देऊन आमदारांच्या खांद्याला खांदा देऊन काम करता येऊ शकेल व काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी त्यांना संधी मिळू शकेल,असेही श्री. छल्लारे यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या