Thursday, May 2, 2024
Homeनगरश्रीरामपूर पोलिसांकडून मोबाईल चोरास अटक

श्रीरामपूर पोलिसांकडून मोबाईल चोरास अटक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर शहर पोलिसांनी जबरी चोरी प्रकरणातील मोबाईल चोरणार्‍या आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून एक मोबाईल हस्तगत केला आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर शहरातील लक्ष्मीनारायण हॉटेलसमोर दि. 1 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 8.55 वाजण्याच्या सुमारास डॉ. शुभदा निखिल पाटणकर (रा. गणपती नेत्रालय हॉस्पिटल, श्रीरामपूर) यांचा वनप्लस नॉर्ड टु हा मोबाईल मोटारसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी हातातून हिसकाऊन चोरून नेला होता. याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.903 / 2022 भादंवि कलम 392, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलीस घेत असताना पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना, सदरचा गुन्हा हा इम्रान अजीत मन्सुरी (रा. गोंधवणी, श्रीरामपूर) याने त्याच्या साथीदारांसह केला असल्याचे समजल्याने त्यांनी तपास पथक बनवून आरोपीचा शोध घेत मन्सुरी याला जेरबंद केले. त्याच्याकडून चोरलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरिक्षक़ विठ्ठल पाटील करीत आहेत.

पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर तसेच उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सहायक पोलीस निरीक्षक़ विठ्ठल पाटील, सहायक पोलीस निरीक्षक़ जिवन बोरसे, उपनिरीक्षक़ दादाभाई मगरे, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल रमिझराजा अत्तार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश गावडे, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र कातखडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रविण क्षीरसागर, तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस नाईक फुरकान शेख व पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव यांनी ही कामगिरी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या