श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी श्रीरामपूर शहरात नवी प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे. या रचनेनूसार एकूण 34 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रभाग रचनेवर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या नव्या रचनेनूसार अनेकांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे, अनेक मातब्बर नगरसेवकांना नव्या भागामध्ये तयारी करावी लागणार आहे.
प्रभाग 16 भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा आहे. हा प्रभाग काळा राममंदिर ते मोरगेवस्ती परिसरापर्यंत आहे. त्यामुळे या भागातील उमेदवारांना पायपीट करावी लागणार आहे. प्रभाग 7 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे तर सर्वात कमी लोकसंख्या प्रभाग 11 मध्ये आहे. पूर्वीचा प्रभाग 14 असलेला प्रभाग आता तोडफोड झाल्याने 14 आणि 15 प्रभागात विभागला गेला आहे. त्यामुळे त्यामुळे या दोन्ही प्रभागातील इच्छुकांची चिंता वाढली आहे.
पूर्वीचा प्रभाग 6 ची तीन विभागात तोडफोड करण्यात आली आहे. आता पूर्वीच्या या प्रभागातील लोकसंख्या तीन प्रभागात विभागली गेली आहे. गतवेळी प्रभाग 6 मध्ये भाजपाचे एकहाती वर्चस्व होते. या प्रभागातून रवी पाटील, भारती कांबळे विजयी झाले होते. रवी पाटील यांनी त्यावेळी 2000 हून अधिक मते घेऊन सरशी केली होती. आता प्रभाग 11 कमी लोकसंख्येचा करण्यात आल्याने येथील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या नव्या प्रभागात सरस्वती कॉलनी परिसराचा उल्लेख नसल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.
पूर्वीचा प्रभाग क्रमांक 13 आणि 14 चा काही भाग हा नव्याने 14 प्रभागात आला आहे. या नव्याने प्रभागात पूर्वीचे 13 व 14 मध्ये निवडून आलेले नगरसेवकांचा प्रभाग हा एकच 14 झाला आहे. त्यामुळे या प्रभागात इच्छुकांची संख्या अधिक असल्याने तिकीटासाठी रस्सीखेच वाढणार आहे. 1, 5, 8 प्रभागही इकडचे तिकडे जोडले गेले आहेत.
प्रभाग 1 मध्ये एकूण 5707 लोकसंख्या असून यामध्ये झिरंगे वस्ती, सोनावणे वस्ती, गुरुनानकनगर, लक्ष्मीनारायण नगर, महादेव मंदिर परिसर, फातेमा हौसिंग सोसायटी, आरसीसी साठवण तलाव, डावखर लॉन परिसर. प्रभाग 2 मध्ये 5532 लोकसंख्या असून यामध्ये एज्यूकेशन हायस्कूल परिसर, आंबेडकर कॉलनी, अण्णाभाऊ साठेनगर, सेंट बापटीस्ट चर्च, वैदुवाडा, वडारवाडा, कंपोस्ट डेपो, गिरमे वस्ती, सुतावणे परिसर, शेडगे मळा, अचानकनगर, जुने तहसील, मिनी स्टेडियम.
प्रभाग 3 मध्ये लोकसंख्या 5499 – तहसील कार्यालय परिसर, सेंट लुक हॉस्पिटल, रेव्हेन्यू कॉलनी, सिद्धार्थनगर, बोरावकेनगर, आरबीएनबी कॉलेज परिसर, आशीर्वादनगर, प्रभाग 4 : लोकसंख्या 5785 – आदर्शनगर, पंजाबी कॉलनी, गाडगेबाबा उद्यान, कर्मवीर भाऊराव चौक, कुरेशा मोहल्ला, तांबे चाळ, लक्ष्मी थिएटर, सिंधी कॉलनी, शिरसाठ हॉस्पिटल, इराणी मोहल्ला, महात्मा फुले सोसायटी, सेंट झेविअर्स स्कूल परिसर.
प्रभाग 5 : लोकसंख्या 5588, काझीबाबा रोड, नेहरूनगर झोपडपट्टी, बागवान गल्ली, गुलाम रसूल मस्जिद परिसर, प्रभाग 6 : लोकसंख्या 5470 – संजयनगर, ईदगा परिसर, डी.एम. मुळे शाळा, रामनगर, मिल्लतनगर, जुने साठवण तलाव परिसर.
प्रभाग 7 : लोकसंख्या 5777 – वैदुवाडा, बजरंग चौक, गौसिया मस्जिद, रोहिदासनगर, धनगर वस्ती, गोपीनाथनगर, मधुलता गार्डन, संजयनगर पाणी टाकी.
प्रभाग 8 : लोकसंख्या 5764 – सैय्यदबाबा दर्गा, बीफ मार्केट, सुभेदार वस्ती, कुरेशी मोहल्ला, शाळा क्र. 4 व 5, पापा जलाल रोड, मरकस मस्जिद रोड परिसर.
प्रभाग 9 : लोकसंख्या 4841 – बसस्टँड, खटोड मार्केट, शिवाजी चौक, रेल्वे स्टेशन, पोस्ट ऑफिस, कामगार हॉस्पिटल, काँग्रेस भवन, राम मंदिर, भाजी व सोनार मार्केट,
प्रभाग 10 : लोकसंख्या 4788 – रेल्वे मालधक्का, कांदा मार्केट, भीमनगर, शिवाजीनगर, खिलारी वस्ती, औद्योगिक वसाहत.
प्रभाग 11 : लोकसंख्या 4787 – चौधरी वस्ती, वढणे वस्ती, उत्सव मंगल कार्यालय, थत्ते ग्राउंड, मोरगे हॉस्पिटल परिसर.
प्रभाग 12 : लोकसंख्या 4869 – नगरपरिषद कार्यालय, जिजामाता चौक, सावतारोड, कुंभार गल्ली, गिरमे चौक, कालिका मंदिर परिसर, के.व्ही. रोड, जुनी घास गल्ली, स्मशानभूमी परिसर व झोपडपट्टी.
प्रभाग 13 : लोकसंख्या 4865 – वडार वाडा, बाजार तळ, शिकलकरी परिसर, तलवार रोड, कॅनललगत झोपडपट्टी, खटोड बालिका विद्यालय, दादा जोशी शाळा परिसर,
प्रभाग 14 : लोकसंख्या 5167 – रिमांड होम, गजानन वसाहत, दहावा ओटा, हिंदुस्थान बेकरी, नॉर्दन ब्रांच, चुना भट्टी व झोपडपट्टी, जवाहर कारखाना, गुलमोहर हॉटेल, द्राक्ष माळा रोड परिसर.
प्रभाग 15 : लोकसंख्या 5022 – जनता हायस्कूल, सिद्धिविनायक मंदिर, प्रवरा हौसिंग, नामदेव हौसिंग, कानिफनाथ मंदिर रोड, लक्ष्मी आई मंदिर रोड, नवशक्ती रोड परिसर,
प्रभाग 16 : लोकसंख्या 4927 – निवारा हौसिंग, आगाशे हॉस्पिटल, म्हाडा कॉलनी, बोरावकेनगर, पाटणी मळा, रासकरनगर, बोंबलेनगर, चित्तरकथी मोहल्ला, मोरगे वस्ती, काळाराम मंदिर, दिनेश स्कूटर रोड,
प्रभाग 17 : लोकसंख्या 4894 – विजय हॉटेल, पुर्णवादनगर, समता कॉलनी, मुळा-प्रवरा कार्यालय, अशोक थिएटर, शिंदे, लबडे वस्ती परिसर अशी श्रीरामपूर पालिकेची नवी प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. या नव्या प्रभाग रचनेमुळे काही भागात लोकसंख्या वाढली तर काही ठिकाणी कमी झाली आहे. यामुळे मतदारसंघाचे स्वरूप बदलल्याने विद्यमान नगरसेवकांचे राजकीय गणित ढवळून निघणार आहे. काहींना आपल्या मजबूत बालेकिल्ल्यातून दूर जावे लागेल तर नव्या चेहर्यांना संधी मिळू शकते. नगरपरिषद निवडणुकीसाठी आता उलटगणती सुरू झाली असून पुढील काही दिवसांत या रचनेवर येणार्या हरकती व सूचनांवर अंतिम निर्णय झाल्यानंतरच निवडणुकीची खरी रंगत दिसून येणार आहे.
अनेकांच्या अडचणी वाढल्या
नवीन तयार झालेल्या प्रभाग रचनेमुळे अनेक प्रभागाची तोडफोड झाली आहे. अनेक वर्षापासून नगरपालिका निवडणूका रंगाळलेल्या होत्या. तेव्हापासून अनेकांनी आपल्या प्रभागात निवडणुकीची तयारी सुरु केली होती. परंतू आता नव्या जाहीर झालेल्या प्रभाग रचनेमुळे अनेक प्रभागांची तोडफोड करण्यात आली, जे तयारीला लागले होते. त्यांना नव्या भागामध्ये पाय रोवावे लागणार आहेत, त्यामुळे अनेकांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे. नव्या तयार झालेल्या 17 प्रभागानूसार प्रभाग 7 मध्ये सर्वाधिक 5777 लोकसंख्या आहे, तर प्रभाग क्र. 11 मध्ये सर्वात कमी 4787 लोकसंख्या आहे.




