Friday, May 1, 2026
HomeनगरAhilyanagar : श्रीरामपूर, पाथर्डी, शेवगावमधून नगराध्यक्षपदासाठी आणखी अर्ज

Ahilyanagar : श्रीरामपूर, पाथर्डी, शेवगावमधून नगराध्यक्षपदासाठी आणखी अर्ज

नगरसेवक पदासाठी 62 इच्छुकांच्या उमेदवारी दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर जिल्ह्यात वाढत्या थंडीसोबत पालिका निवडणूकांचा ज्वर चढताना दिसत आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील 12 पालिकांच्या नगराध्यक्षपदासाठी नव्याने सहा तर नगरसेवक पदासाठी 62 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात श्रीरामपूरमध्ये नगराध्यक्षपदासाठी 4 तर पाथर्डी आणि शेवगावमध्ये प्रत्येकी एका अर्जाचा समावेश आहे.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात 12 पालिकांच्या निवडणुकीसाठी हळूहळू रंगत वाढतांना दिसत आहे. यंदाच्या पालिका निवडणूकांचे वैशिष्ट्ये म्हणजे स्थानिक राजकीय समिकरणांचा प्रभाव या निवडणुकीत दिसत आहे. या निवडणुकीसाठी आता आज शनिवार उद्या रविवार आणि सोमवार असे शेवटचे तीन दिवस शिल्लक असून यावेळी इच्छुकांची मोठी गर्दी होणार असल्याचे चित्र आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती की महाविकास आघाडी अशी लढत होणार की याबाबत सुस्पष्ट घोषणा झालेली नसली तरी जवळपास यासर्व निवडणूका या स्वबळावर अथवा स्थानिक आघाड्या म्हणून लढणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. सोमवारी उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून त्यानंतर दाखल अर्जाची छानणीनंतर 21 ते 25 नोव्हेंबरपर्यंत माघारीसाठी मुदत राहणार आहे. त्यानंतर खर्‍याअर्थाने निवडणुकीची रणधुमाळीरंगणार असल्याचे दिसत आहे.

संगमनेर, शिर्डी, देवळाली, राहुरी, नेवाशात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची प्रतिक्षा
पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी सोमवार (दि.10) पासून सुरूवात झाली. तेव्हापासून उमेदवारी दाखल करण्याचे पाच दिवस संपले असून आतापर्यंत संगमनेर, शिर्डी, देवळाली प्रवरा, राहुरी नगरपालिका व नेवासा नगरपंचायत निवडणुकीत अद्याप नगराध्यक्षपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. या पालिका वगळून श्रीरामपूरसाठी 5, कोपरगाव 1, राहाता 2, पाथर्डी 1, श्रीगोंदा 1, जामखेड 1 आणि शेवगाव पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी चार असे 15 इच्छुकांचे नगराध्यक्षपदासाठी तर नगरसेवक पदासाठी देवळाली प्रवरा वगळता उर्वरित सर्व ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल आहेत. यात संगमनेर 1, श्रीरामपूर 11, कोपरगाव 7, शिर्डी 5, राहाता 1, राहुरी 1, पाथर्डी 5, श्रीगोंदा 7, जामखेड 2, शेवगाव 35 आणि नेवासा 1 यांचा समावेश आहे.

श्रीरामपूर नगराध्यक्ष पदासाठी काल संजय छल्लारे. अशोक थोरे, निलेश भालेराव. जोएफ शेख यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...