Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यात नवीन 150 करोनाबाधित

श्रीरामपूर तालुक्यात नवीन 150 करोनाबाधित

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल उच्चांकी 150 रुग्ण सापडले आहेत. तर 762 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

- Advertisement -

शहरात 89, तालुक्यात 56 रुग्ण काल आढळून आले असून बाहेरील तालुक्यातील 5 असे रुग्ण आहेत. काल 78रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कालही करोनारुग्ण वाढीच्या बाबतीत अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर दुसर्‍या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे.

जिल्हा रुग्णालयात 26 ,खासगी रुग्णालयात 61 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 63 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 78 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 762 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 1692 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 828 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 762 रुग्ण विविध कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

श्रीरामपूर शहरात वॉर्ड नं. 1-15, वॉर्ड नं. 2-13, वॉर्ड नं. 3-03, वॉर्ड नं. 4-01, वॉर्ड नं. 6-01, व वॉर्ड नं. 7-15 तसेच शहरात खासगी ठिकाणी केलेल्या तपासणीत 41 असे एकूण 89 रुग्ण आढळून आले.

श्रीरामपूर ग्रामीण शिरसगाव-03, कमालपूर-02, मुठेवाडगाव-04, वडाळामहादेव-01, पढेगाव-04, कडीत बुद्रुक-01, टाकळीभान-07, गुजरवाडी-02, गोंडेगाव-01, भैरवनाथनगर-03, बेलापूर-05,खंडाळा-01, वांगी-02, दत्तनगर-05, उक्कलगाव-01, उंदिरगाव-07, अशोकनगर-02, खिर्डी-01, मालुंजा-03, वळदगाव-01 असे 56 रुग्ण आढळून आले आहेत.

राहाता तालुक्यातील रांजणखोल-01, चोळकेवाडी-01, नांदूर-02, नेवासा तालुक्यातील पाचेगाव-01 असे अन्य तालुक्यातील 5 रुग्ण आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या