Thursday, February 12, 2026
Homeक्राईमShrirampur : श्रीरामपुरात शिक्षकाकडून चिमुकलींशी असभ्य वर्तन

Shrirampur : श्रीरामपुरात शिक्षकाकडून चिमुकलींशी असभ्य वर्तन

एका प्रतिष्ठीत शाळेतील घटना

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील एका प्रतिष्ठित प्राथमिक शाळेत एका शिक्षकानेच आठ वर्षीय चार चिमुकलींशी असभ्य वर्तन केल्याची घटना समोर आली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित शिक्षकाला तत्काळ अटक केली आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर शहरातील एका नामांकीत प्राथमिक शाळेतील शिक्षक सचिन महाजन गोणारकर (वय 35, रा. गोणार्क, ता. कंधार, जि. नांदेड, ह. मु. वॉर्ड क्र. 7, श्रीरामपूर) या शिक्षकाची 1 ऑगस्ट 2025 रोजी शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे संबंधित शाळेवर नियुक्ती करण्यात आली होती. या शिक्षकाने तो शिकवत असलेल्या वर्गातील इयत्ता दुसरीतील चार विद्यार्थिनींशी केलेल्या असभ्य वर्तनाची वाच्यता संबंधित विद्यार्थिनींनी आपल्या पालकांकडे केली. याचा जाब विचारण्यासाठी पालकांनी शाळा गाठली, त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांची भेट घेऊन सदर प्रकार कानावर घातला.

YouTube video player

शहर पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेत गोणारकर या शिक्षकाविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे. संबंधित शिक्षक आणि विद्यार्थींनीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
शाळेसारख्या विद्येच्या मंदिरात अशाप्रकारचे कृत्य एका शिक्षकानेच केल्याने समाजाममध्ये सदर शिक्षकाबद्दल मोठा असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर शिक्षकाला कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 18 बोगस आणि 28 तपासणीला गैरहजर असणार्‍या दिव्यांगांना नोटीस

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मागील महिन्यांत जिल्हा परिषद प्रशासनाने दिव्यांग कर्मचार्‍यांची प्रमाणपत्रे तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात पाठवली होती. यातील 203 दिव्यांगांची तपासणी करून जिल्हा रूग्णालयाने नुकताच जिल्हा...