Monday, May 6, 2024
Homeधुळेदोंडाईच्यातील भावंडांचा मोटारसायकलीवर देश फिरण्याचा संकल्प

दोंडाईच्यातील भावंडांचा मोटारसायकलीवर देश फिरण्याचा संकल्प

दोंडाईचा Dondaicha । श.प्र.

उच्च शिक्षित तरुण अरीफखान पठाण व गुलामरसुल शेख हे दोघे भावंडे (Siblings) प्रवासाचा छंद (hobby of travel) जोपासत त्यांनी मोटारसायकलीने (motorcycle) फिरण्याचा मानस (travel the country) त्यांनी व्यक्त केला आहे. तर आता पावेतो त्यांनी लाखो किलोमीटरचा प्रवास केला आहे. तर सध्या साडेसहा हजार किलोमीटर जम्मू काश्मीरसह विविध ठिकाणी फिरुन ते दोघे दोंडाईचा येथे परतले आहेत.

- Advertisement -

साडेसहा हजार किमी प्रवास करत अनेक पर्यटन स्थळासह विविध धार्मिक स्थळांना भेटी देऊन त्यांनी साडेसहा हजार किमी प्रवास केला आहे. दोन्ही भाऊ बांधकाम अभियंता आहे.

दोंडाईचा ते जम्मू काश्मीर पर्यंत जात आपल्या कार्याचा ठसा उमटविला त्यांनी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर, लदाख, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश, असा एकूण नऊ राज्यात प्रवास करून दोंडाईचा येथे त्यांचे आगमन झाले आहे. त्यांनी प्रत्येक राज्यातील संस्कृती चालीरीती राहणीमान, त्याठिकाणी असलेले धार्मिक स्थळांची पाहणी करत त्यांचा इतिहास जाणून घेतला.

प्रवास काही ठिकाणी बर्फाच्छादित प्रदेशात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. द्रास, लदाख मधील सर्वात उंच ग्रास थंड हवामान होते, सर्वात उंच रस्ता खारडुंगला या 17 हजार उंचीच्या शिखरावर द्रास याठिकाणी भेटी त्यांनी दिल्या. तसेच त्यांनी 18 हजार फूट उंच मारस्कमिकला तसेच 19 हजार फूट उंच व जगातील दुसरे थंड हवेचे ठिकाण द्रास याठिकाणीही भेट दिली.

त्याठिकाणी ऑक्सिजन प्रमाण कमी असल्याने रस्त्यावर प्रवास करतांना शिखरावर मोटरसायकल प्रवास करतांना अनेक संकटाना सामना केला ते दरवर्षी जवळपास सहा हजाराचा प्रवास करणारा आहेत.

नुकताच त्यांनी जम्मू कश्मीर येथे मोटरसायकलवर स्वारी करून तेथील प्रवास करून त्यांनी सहल केली आहे यासह त्यांचा यापूर्वी महाबळेश्वर, लोणावळा, अजमेर, जयपूर, भोपाल, हैदराबाद, यासह आदी ठिकाणी प्रवास केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या