Monday, May 6, 2024
Homeनाशिकशुsss! जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट

शुsss! जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील २२ हजार महसूल कर्मचाऱ्यांनी (Revenue staff) आज (दि. २८) एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारला. यात जिल्हाधिकारी कार्यालयातील (Collector’s Office) ४९१ कर्मचारी संपावर होते. त्यामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे…

- Advertisement -

दरम्यान, शासनाचे (Government) मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनांनी २३ मार्चपासून साखळी आंदोलन (Agitation) सुरू केले आहे. त्या अंतर्गत जेवणाच्या सुटीत निदर्शने, घंटानादासह काळ्या फिती लावून कामकाज केले.

Visual Story : काश्मिरी पंडितांचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचे विचार कसे होते?

मात्र, तरीही शासनाने मागण्यांकडे लक्ष न दिल्याने कर्मचाऱ्यांनी आज सोमवारी (दि. २८) एकदिवसीय संप पुकारला आहे. या संपामुळे महसूल विभागातील मार्च अखेरची कामे ठप्प होणार आहेत. दरम्यान, त्यानंतरही शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास येत्या ४ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

दिलासा! नाशिक @शून्य; आज एक करोनामुक्त

या आहेत मागण्या

महसूल कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यात नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण ३३ वरून २० टक्के करण्यासह विभागात सहायकांची रिक्त पदे भरणे, पदोन्नती, नायब तहसीलदारांची ग्रेड पे ४६०० रुपये करणे, राज्यातील २७ नव्या तालुक्यांत विविध कामकाजांसाठी पदनिर्मिती अस्थायी पदे स्थायी करणे तसेच तालुकास्तरावर खनिकर्म निरीक्षक दर्जाचे पद निर्माण करताना पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना वर्ग-३ पदावर बढती देणे आदी मागण्यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या