Wednesday, May 8, 2024
Homeजळगावपहिली पत्नी असतांना दुसरीशी रेशीम गाठ

पहिली पत्नी असतांना दुसरीशी रेशीम गाठ

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

पहिली पत्नी (first wife) असतांना तरुणाने (youth) दुसरीशी विवाह (Marriage to another) करीत संसार थाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पती व सासरच्या मंडळींसह (husband and father-in-law) मध्यस्थी करणार्‍यांविरुद्ध (Against Intermediaries) फसवणुक व अत्याचार (Fraud and torture) केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात (Ramanand Nagar Police Station) गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरातील जीवन नगरात राहणार्‍या सत्यजित रविंद्र सोनवणे याचा पहिला घटस्फोट होवून त्याचा भाग्यश्री सत्यजित सोनवणे यांच्याशी विवाह झाला आहे. लग्न ठरविण्यासाठी त्याचे सत्यजित सोनवणे त्याचे वडील रविंंद्र चिंधू सोनवणे, आई उषा सोनवणे बहीण दिपाली सुधिर शिंदे, किरण अशोक यशवंद, सुदर्शन वाल्हे हे गेले होते. त्यांनी सत्यजितचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाल्याचे सांगून त्याचा दुसरा विवाह झाला नसल्याची हमी सुशिल बागुल यांच्यासमक्ष दिली होती. त्यानंतर ठरल्याप्रमाणे त्या दोघांचा विवाह दि. 22 मे 2021 रोजी झाला होता.

पतीचा भांडाफोड

विवाहिता पतीसह सासरी नांदत असतांना तिला पती सत्यजीत यांच्या मोबाईलमध्ये एका महिलेसोबत लग्नाचे फोटो दिसले. त्यांनी पतीला याबाबत विचारणा केली, परंतु त्याने विवाहितेला शिवीगाळ करीत मारहाण करीत हे फोटो खोटे असल्याचे सांगितले. त्यानंतर विवाहितेने माहेरच्यांना बोलावून घेत सासरच्यांना जाब विचारला. यावेळी त्यांच्याकडून विवाहितेच्या सासरच्यांना देखील मारहाण करण्यात आली.

मारहाणीच्या घटनेनंतर दि. 8 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच विवाहावेळी विवाहेच्या वडीलांनी 15 ग्रॅमची चैन, 10 ग्रॅमचे कानातले टोंगल व पतीला 5 ग्रॅमची अंगठी असे दिले होते.

परंतु सासरच्यांनी एक महिना चांगली वागणुक दिली त्यानंतर त्यांच्याकडून मानसिक व शाररीक छळ सुरु झाला. पतीची पहिली पत्नी असल्याचे माहिती असून त्याच्या कुटुंबियांनी त्याचा दुसरा विवाह करीत विवाहितेची फसवणुक केल्याप्रकरणी सत्यजित सोनवणे त्याचे वडील रविंंद्र चिंधू सोनवणे, आई उषा सोनवणे तिघ रा. जीवननगर, बहीण दिपाली सुधिर शिंदे रा. शांतीनगर, किरण अशोक यशवंद उल्हासनगर, सुदर्शन वाल्हे रा. सत्यमपार्क शिवाजी नगर यांच्याविरुद्ध फसवणुक व विवाहितेचा छळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या