नाशिक | Nashik
सिंहस्थाच्या यशस्वी आयोजनासाठी नाशिक पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीकाठावर घाट, बलून (रबर) बंधारे, उपसा योजना आणि आपत्कालीन व्यवस्थापन यासारखी महत्त्वाकांक्षी कामे प्रस्तावित केली आहेत. या प्रणालीमुळे सिंहस्थाचे यशस्वी आयोजन होण्यास मदत होईल, या प्रकल्पांमुळे भाविकांना सुरक्षित आणि सुविधायुक्त वातावरण मिळेल. नाशिक शहरातील पायाभूत सुविधांचा विकास होण्यास हातभार लागणार आहे. आगामी सिंहस्थासाठी नियोजित प्रकल्पांबाबत माहिती देत आहेत, नाशिक पाटबंधारे विभागाच्या (Nashik Irrigation Department) कार्यकारी अभियंता सोनल शहाणे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर (Nashik and Trimbakeshwar) येथे आयोजित होणारा सिंहस्थ हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा उत्सव मानला जातो. नाशिक, त्र्यंबकेश्वरसाठी हा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्वाचा सोहळा आहे. दर बारा वर्षानी होणाऱ्या या सोहळ्यात देश-विदेशातून कोट्यवधी भाविक गोदावरी नदीतीरावर (Godavari River) अमृतस्नानासाठी येतात. सिंहस्थाच्या यशस्वी आयोजनासाठी नाशिक पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीकाठावर घाट, बलून (रवर) बंधारे, उपसा योजना आणि आपत्कालीन व्यवस्थापन यासारखी महत्त्वाकांक्षी कामे प्रस्तावित केली आहेत. या प्रणालीमुळे सिंहस्थाचे यशस्वी आयोजन होण्यास मदत होईल. या प्रकल्पांमुळे भाविकांना सुरक्षित आणि सुविधायुक्त वातावरण मिळेल. नाशिक शहरातील पायाभूत सुविधांचा विकास होण्यास हातभार लागणार आहे. जलसंपदा विभागाचे हे प्रयत्न सिंहस्थाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि भाविकांच्या आध्यात्मिक अनुभवाच्या परिपूर्तीसाठी मोलाचे ठरतील, असा विश्वास नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता तथा नाशिक जिल्हा सहाय्यक पूर समन्वयक सोनल शहाणे यांनी व्यक्त केला.
घाटांचे बांधकाम
सिंहस्थासाठी नाशिक पाटबंधारे विभागाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीच्या काठावर नवीन घाट बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे अमृतस्नाना दरम्यान भाविकांची गर्दी नियंत्रित करणे प्रशासनाला सोयीचे होईल. नाशिक शहरात दोन प्रमुख घाट प्रस्तावित आहेत. यामध्ये कपिला संगम येथे गोदावरी नदीच्या उजव्या तीरावर ४०० मीटर लांबीचा घाट बांधण्यात येणार आहे. टाकळी येथे गोदावरी आणि नंदिनी नदीच्या संगमाच्या डाव्या तीरावर ४०० मीटर लांबीचा घाट प्रस्तावित आहे. या घाटांमुळे भाविकांना अमृत स्नानासाठी सुरक्षित आणि सोयीस्कर जागा उपलब्ध होईल. नव्या घाटांमुळे नदीतीरावरील गर्दीचे व्यवस्थापन सुकर होईल. नाशिक शहरातील पायाभूत सुविधांचा ताण कमी होईल. या घाटांचे बांधकाम तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रियेद्वारे हाती घेतले जाईल, असे शहाणे यांनी सांगितले.
‘बलून’ बंधारे प्रस्ताव
सिंहस्थासाठी नाशिक पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीवर बलून (स्बर) बंधाऱ्यांसाठी नावीन्यपूर्ण प्रस्ताव मांडला आहे. रबर बंधारे सिंहस्थाच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका बजावतील आणि भाविकांना सुरक्षित, सुविधायुक्त अनुभव त्यातून मिळणार आहे. हे बंधारे अमृत स्नानादरम्यान भाविकांसाठी नदीतील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि गोदावरीचा प्रवाह स्थिर ठेवण्यास महत्वपूर्ण योगदान देतील. प्रस्तावित रबर बंधारे आनंदवल्ली आणि नंदिनी संगम येथे बांधले जाणार आहेत, आनंदवल्ली येथील बंधारा गंगापूर धरणापासून ९.१० किमी अंतरावर रिमॉडेलिंगद्वारे उभारला जाईल, याची साठवण क्षमता २ मीटर उंचीसाठी १६ दशलक्ष घनफूट आणि ३ मीटर उंचीसाठी २४ दशलक्ष घनफूट इतकी आहे. हा बंधारा रामकुंड येथे पाणी पोहोचण्याचा वेळ ७ तासांवरून २.५ तासांपर्यंत कमी करेल, असे शहाणे यांनी सांगितले.
नंदिनी संगम येथील बंधारा नदी संगमाजवळ पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करेल. या बंधाऱ्यांमुळे गंगापूर धरणातून येणारे पाणी आणि मुक्त पाणलोट क्षेत्रातील पाणी साठवणे शक्य होईल, यामुळे अमृत अमृत स्नानादरम्यान रामकुंड आणि इतर घाटांवर आवश्यक पाणी उपलब्ध होईल. रबर बंधारे लवचिक आणि त्वरित नियंत्रणक्षम असल्याने पाण्याची पातळी तत्काळ समायोजित करता येईल. याशिवाय, हे बंधारे पूर नियंत्रण आणि नदीप्रवाहाचे व्यवस्थापन यासाठीही उपयुक्त ठरतील. नाशिक पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्यांचे सविस्तर संकल्पन आणि अंदाजपत्रके तयार केली आहेत. तांत्रिक प्रशासकीय मान्यता आणि निविदा प्रक्रियेनंतर ही कामे हाती घेतली जातील.
‘वॉटर ग्रीड’चा प्रस्ताव
नाशिक पाटबंधारे विभागाने त्र्यंबकेश्वर येथे उपसा योजना आणि ‘वॉटर ग्रीड’ तयार करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश गोदावरी नदीचा प्रवाह कायम ठेवणे आणि विकेंद्रित पाणीसाठे भरणे हा आहे. यामुळे अमृतस्नानादरम्यान भाविकांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल. नदीतील पाण्याची पातळी नियंत्रित राहील. उपसा योजनेमुळे त्र्यंबकेश्वरचे पाणी व्यवस्थापन अधिक बळकट होईल, तर ‘वॉटर ग्रीड’ नदी आणि साठ्यांतील पाण्याचे सुयोग्य वितरण सुनिश्चित करेल, ही योजना सिंहस्थाच्या यशस्वी आयोजनात महत्वाची भूमिका बजावेल, तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रियेतून हे काम हाती घेतले जाणार आहे. या उपाययोजनांमुळे भाविकांना सुरक्षित आणि सुविधायुक्त अनुभव मिळेल आणि त्र्यंबकेश्वर येथील पाणी व्यवस्थापनाला नवीन दिशा मिळेल.
आपत्कालीन व्यवस्थापन
पाटबंधारे विभागाने आपत्कालीन व्यवस्थापन आणि पूर नियंत्रणासाठी महत्वाकांक्षी योजना आखली आहे. नाशिक शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि सिंहस्थादरम्यान संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जलसंपदा विभागाने गंगापूर धरणाचा आपत्कालीन कृती आराखडा तयार केला आहे. हा आराखडा धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर त्वरित उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. याशिवाय, रिअल-टाइम डेटा अॅकिझिशन सिस्टिमअंतर्गत ‘अलीं वॉर्निंग फ्लड सिस्टीम’ विकसित केली जात आहे. या प्रणालीतून गोदावरी नदी आणि तिला जोडणान्या नाले ओढ्यांमधील पाण्याच्या विसर्गाचे रिअल टाइम मोजमाप केले जाईल. यासाठी नदी, नाले आणि ओबंधावर मोजमाप यंत्र बसवली जातील. ती धरणातील विसर्ग आणि स्थानिक पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा ताळमेळ ठेवण्यास मदत करतील. या प्रणालीमुळे नदीतील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवणे आणि पूरपरिस्थिती हाताळणे शक्य होईल. ही यंत्रणा धरणातील पाण्याचा विसर्ग आणि इतर नाते ओट्यांमधील पाण्याच्या प्रवाहाचे समन्वय साधेल. त्यामुळे प्रशासनाला पूर नियंत्रणासाठी त्वरित निर्णय घेता येतील. या प्रणालीचा फायदा अमृत स्नानादरम्यान नदीतील पाणी पातळी सुयोग्य राखण्यासाठी होईल. तसेच, नाशिक शहरातील पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवून भाविकांचे सुरक्षित आणि सुविधायुक्त वातावरण सुनिश्चित होईल, या उपाययोजनांसाठी तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निविदा प्रक्रियेतून कामे हाती घेतली जातील. ‘अर्ली वॉर्निंग फ्लड सिस्टीम आणि आपत्कालीन कृती आराखडा यामुळे सिंहस्थाचे यशस्वी आयोजन होईल, त्यातून शहराला दीर्घकालीन सुरक्षिततेचा लाभ मिळण्यास मदत होईल.
आव्हाने आणि तयारी
सिंहस्थ हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा आहे. २०१५ मधील सिंहस्थात सुमारे २.५ कोटी भाविकांनी सहभाग घेतला होता. २०२७ मध्ये ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनासमोर गदीं व्यवस्थापन, सुरक्षितता आणि सुविधा पुरवण्याचे मोठे आव्हान आहे. साधु, महंत, यात्रेकरू, पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांना सुरक्षित, सुविधायुक्त आणि आध्यात्मिक अनुभव देणे हे प्रशासनाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. या आव्हानांना वाँड देण्यासाठी नाशिक पाटबंधारे विभागाने अनेक महत्त्वपूर्ण उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. गोदावरीवर कपिला संगम आणि टाकळी येथे घाट बांधले जातील. त्यामुळे अमृतस्नानावेळी भाविकांची गर्दी नियंत्रित होईल. त्र्यंबकेश्वर येथील उपसा योजना आणि ‘बॉटर ग्रीड’ नदीचा प्रवाह कायम ठेवून पाण्याचे समन्वयित वितरण सुनिश्चित करेल. याशिवाय, गंगापूर धरणाचा आपत्कालीन कृती आराखडा व रिअल-टाइम डेटा ऑक्क्रझिशन सिस्टीम अंतर्गत अर्ली वॉर्निंग फ्लड सिस्टीम पूरपरिस्थिती हाताळणे आणि पाण्याची पातळी नियंत्रित्त ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल. ही कामे तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर हाती घेतली जातील. या उपाययोजनांमुळे भाविकांना सुरक्षित आणि सुविधायुक्त वातावरण मिळेल. तसेच, नाशिक च्या पायाभूत सुविधांचा विकास होईल. प्रशासनाच्या नियोजनबद्ध तयारीमुळे सिंहस्थाचे यशस्वी आयोजन होऊन भाविकांचा आध्यात्मिक अनुभव समृद्ध होईल, असे शहाणे म्हणाल्या.
मुद्दे
- सिंहस्थाच्या यशस्वी आयोजनासाठी नाशिक पाटबंधारे विभागाकडून गोदावरी नदीकाठावर घाट, बलून बंधारे, उपसा योजना आणि आपत्कालीन व्यवस्थापन यासारखी महत्त्वाकांक्षी काने प्रस्तावित.
- प्रस्तावित प्रकल्पांडुन सिंहस्थाचे यशस्वी आयोजन होण्यास मदत भाविकांना सुरक्षित आणि सुविधायुक्त बातावरण लाभणार नाशिक महानगरातील पायाभूत सुविधांचा विकास होण्यास हातभार.
- गोदावरी नदीच्या उजव्या तीरावर ४०० मीटर लांबीचा घाट बांधणार टाकळी येथे गोदावरी आणि नंदिनी नदी संगमाच्या डाव्या तीरावर ४०० मीटर लांबीचा घाट प्रस्तावित.
- सिंहस्थारतठी गोदावरी नदीवर ‘बलून’ (एबर) बंधारे बांधणार सिंहस्थाच्या यशस्वी आयोजनात बलून बंधारे मोलाची भूमिका बजावतील. आनंदवली आणि नंदिनी संगम येथे हे बंधारे प्रस्तावित.
- त्र्यंबकेश्वर येथे उपसा योजना आणि ‘वॉटर ग्रीड’ तयार करण्याचा प्रस्ताय, गोदावरी नदीप्रवाह कायम ठेवणे आणि विकेंद्रित पाणीसाठे भरणे हा या योजनेचा मुख्य उद्देश.




