Friday, May 3, 2024
Homeजळगावविद्यापीठात गायिका पंडिता मंजिरी कर्वे यांची विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

विद्यापीठात गायिका पंडिता मंजिरी कर्वे यांची विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

जळगाव jalgaon प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) संगीत विभागाच्यावतीने (Department of Music) शनिवार दि. २५ मार्च रोजी सुप्रसिध्द गायिका पंडिता मंजिरी कर्वे-आलेगावकर (Singer Pandita Manjiri Karve-Alegaonkar) यांची विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा (workshop) होणार आहे.

- Advertisement -

शनिवारी सकाळी १०:३० ते ४:३० या कालावधीत विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळेच्या सभागृहात “नाट्यसंगीतातील बारकावे” या विषयावर मंजिरी कर्वे आलेगावकर या कार्यशाळा घेतील. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली असून वयाचे कोणतेही बंधन नाही.

नोंदणी शुल्क २००/- रूपये आहे. इच्छूकांनी भ्रमणध्वनी क्रमांक ७०२०२३७८३५ अथवा ९४२२२३५४५८ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन या कार्यशाळेच्या समन्वयक अलका चव्हाण यांनी केले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या