Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याकरोना अजून संपलेला नाही; नाशकातील 'या' दोन तालुक्यांत आहेत पावणे पाचशे रुग्ण

करोना अजून संपलेला नाही; नाशकातील ‘या’ दोन तालुक्यांत आहेत पावणे पाचशे रुग्ण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकमध्ये कारोनाचे रुग्ण (Covid positive patients) कमी झाले असले तरीदेखील ग्रामीण भागात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. आजही सिन्नर (Sinnar) आणि निफाड (Niphad) या दोन तालुक्यातील रुग्णसंख्या ही जवळपास पाचशेच्या घरात आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असून संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर धोक्याची घंटा असल्याचे दिसून येत आहे. (Nashik Two talukas covid patients increased)

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ९८ हजार १२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत १ हजार ३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६१९ रुग्णांचा मृत्यू करोनाचा संसर्ग झाल्यामुळे झाला आहे. (Covid Death)

नाशिक ग्रामीणमध्ये (Nashik rural) आजही सिन्नर तालुक्यात (Sinnar Taluka) २९० रुग्ण उपचार घेत आहेत तर निफाड १८० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर नाशिक तालुक्यात २९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर बागलाणमध्ये १५, चांदवड ३८, देवळा ३२, दिंडोरी २७, इगतपुरी ०७, कळवण ०२, मालेगाव ०९, नांदगाव ०६, सुरगाणा ०२, त्र्यंबकेश्वर ११, येवला ७८ असे एकूण ७२६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

तर पेठ तालुक्यात सद्यस्थितीत एकही रुग्ण नसल्याचे समोर आले आहे. (Covid patients not found in Peth) तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २७९ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १६ तर जिल्ह्याबाहेरील १४ रुग्ण असून असे एकूण १ हजार ३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ७ हजार ७८० रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या २४ तासांत नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक तालुक्यात ०४, बागलाण ०१, चांदवड ०२, देवळा ०४, दिंडोरी ०३, इगतपुरी ००, कळवण ००, मालेगाव ०१, नांदगाव ००, निफाड १४, पेठ ०१, सिन्नर १९, सुरगाणा ००, त्र्यंबकेश्वर ०१, येवला ११ असे एकूण ६१ पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९६.८९ टक्के, नाशिक शहरात ९८.१५ टक्के, मालेगाव मध्ये ९७.०६ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.७४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.६३ इतके आहे.

नाशिक ग्रामीण ४ हजार १५७ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३ हजार ९७९ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५७ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ६१९ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या