Tuesday, September 17, 2024
Homeनाशिकसिन्नर तालुका दुष्काळमुक्त होणार

सिन्नर तालुका दुष्काळमुक्त होणार

नदीजोड प्रकल्पाच्या डीपीआरला राज्य तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सिन्नर तालुक्यासाठी वरदान ठेवणाऱ्या दमनगंगा -अप्पर वैतरणा – कडवा – देवलिंग या नदीजोड प्रकल्पास जनसंपदा विभागाच्या राज्य तांत्रिक सल्लागार समितीने नुकतीच मान्यता दिली असून पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव आज गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे पाठविला आहे.महामंडळाकडून परिपूर्ण प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी लवकरच शासनाकडे पाठविला जाणार असून वर्षभरात प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती माजी खासदार गोडसे यांनी दिले आहे .

दमनगंगा -अप्पर वैतरना – कडवा – देवलिंग या नदीजोड प्रकल्पासाठी गेल्या काही वर्षांपासून माजी खासदार हेमंत गोडसे यांनी शासनाकडे सततचा पाठपुरावा सुरूच होता. जलसंपदा विभागाने एका नामांकीत कंपनीकडून दोन वर्षांपूर्वी वरील नदीजोड प्रकल्पाचा सविस्तर डीपीआर तयार करून घेतला होता. सदरचा डीपीआर मान्यतेसाठी राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला होता नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव मार्गी लागावा यासाठी दीड वर्षांपूर्वी माजी खासदार गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत सदरच्या प्रस्तावास मान्यता देऊन निधीची तरतूद करण्याची जोरदार मागणी केली होती. वर्षभरापूर्वी औरंगाबाद येथे झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत शासनाने वरील नदीजोड प्रकल्पाच्या मान्यतेची अनोपचारिक घोषणाही केली होती.

नदीजोड प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या डीपीआरला राज्य तांत्रिक सल्लागार समितीने मान्यता द्यावी यासाठी माजी खासदार गोडसे यांच्याकडून सततचा पाठपुरावा सुरू होता. आता या पाठपुराव्याला यश आले आहे.डीपीआरच्या प्रस्तावास राज्य तांत्रिक सल्लागार समितीने मान्यता दिली असून पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव सल्लागार समितीने आज औरंगाबाद येथील कार्यकारी संचालकांकडे पाठविला आहे.सदर प्रस्ताव परिपूर्ण करून लवकरात प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार गोडसे यांनी दिली आहे. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा वापर जायकवाडी आणि सिन्नर तालुक्यासाठी करण्यात येणार आहे. नदीजोड प्रकल्पामुळे सिन्नर तालुक्याचा दुष्काळी तालुका हा कलंक कायमचा पुसला जाणार आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या