Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशधक्कादायक! बहिणीने केली लहान भावाची हत्या; कारण ऐकून थक्क व्हाल

धक्कादायक! बहिणीने केली लहान भावाची हत्या; कारण ऐकून थक्क व्हाल

नवी दिल्ली | New Delhi

हरियाणातील (Haryana) वल्लभगडमध्ये एका अल्पवयीन मुलीने (Minor Girls) क्षुल्लक कारणावरून तिच्या धाकट्या भावाची गळा दाबून हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे…

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी आणि तिचा भाऊ उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) त्यांच्या आजी-आजोबांसोबत राहत होते. उन्हाळ्याच्या (Summer) सुट्टीत ते दोघे आई-वडिलांकडे वल्लभगड (Vallabhgarh) येथे आले होते. या मुलांच्या आई-वडिलांनी त्यांच्या मुलाला मोबाईल फोन दिला होता.

Nashik : खून झाल्याची बतावणी करुन महिलेला लुटले

मंगळवारी मुलगा त्या फोनवर गेम खेळण्यात मग्न असताना बहिणीने (Sister) काही वेळ मलाही फोन दे अशी विनंती भावाकडे केली. परंतु भावाने फोन देण्यास नकार दिला. त्यामुळे रागाच्या भरात तिने भावाची गळा दाबून हत्या केली. तसेच आई-वडील माझ्यापेक्षा भावावर जास्त प्रेम करतात, त्यामुळे हत्या केली असेही त्या मुलीने पोलिसांना चौकशीवेळी सांगितले.

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; ट्रक पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळला

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी (Police) अल्पवयीन मुलीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिला आज जुवेनाइल जस्टिस बोर्डासमोर हजर करण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

हृदयद्रावक! मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच आईचेही निधन

- Advertisment -

ताज्या बातम्या