Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशभरधाव ट्रकची बसला धडक; ६ जण जागीच ठार, ट्रक चालक फरार

भरधाव ट्रकची बसला धडक; ६ जण जागीच ठार, ट्रक चालक फरार

बहराइच | Bahraich

- Advertisement -

मध्यप्रदेशातील लखनऊ-बहराइच महामार्गावर आज सकाळी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर १५ प्रवासी गंभीर जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचारच्या सुमारास धुक्यामुळं लखनौ इदगाह डेपोच्या रस्त्याच्या कडेला भरधाव ट्रकनं धडक दिल्यानं हा अपघात झाला. जरवाल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घर्घरा घाटाजवळ हा अपघात झाला. या बसमध्ये जवळपास २० ते २५ प्रवासी होते.

धडक इतकी भीषण होती की यामध्ये बसचा चक्काचूर झाला. धुक्यामुळंच हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच सीओ आणि एसडीएम कैसरगंज घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्य सुरू केलं. अपघातग्रस्त बस लखनौहून बहराइचला जात होती.

दरम्यान, या अपघातानंतर ट्रकचालक हा ट्रकसह घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच ट्रकची ओळख पटवण्यासाठी पोलिस जवळपासच्या ढाब्यांवर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरेही तपासत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या