Tuesday, September 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसप्तशृंगी गडावर कार अपघातात सहा भाविकांचा मृत्यू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडून...

सप्तशृंगी गडावर कार अपघातात सहा भाविकांचा मृत्यू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडून शोक व्यक्त

नाशिक | Nashik

सप्तशृंगीगड देवीचे दर्शन करुन परतत असतांना इनोव्हा कार (एमएच १५ बीएन ०५५५) सप्तशृंगीगडावरील घाटाच्या दरीत कोसळून झालेल्या अपघातात सहा भाविक ठार झाले आहेत.

दरम्यान या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मिडिया ‘एक्स’ अकाऊंट वर शोक व्यक्त व्यक्त करत त्यात म्हण्टले आहे की, ‘नाशिक जिल्ह्यात सप्तश्रृंगी गडावरून एक वाहन कोसळून झालेल्या अपघातात 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू असून संपूर्ण यंत्रणा तेथे सज्ज ठेवण्यात आली आहे.या भाविकांच्या वारसांना 5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य राज्य सरकारच्या वतीने देण्यात येईल.’

- Advertisement -

ताज्या बातम्या

Nashik News : सप्तशृंगीगड-नांदुरी घाटरस्ता ‘या’ तारखेपर्यंत बंद; ग्रामस्थांसह भाविकांचा विरोध

0
सप्तशृंगीगड | वार्ताहर | Saptashrungigad सप्तशृंगीगड ते नांदुरी घाटरस्त्याच्या (Saptashrungigad and Nanduri Ghat Road) काँक्रिटीकरणासाठी हा मार्ग येत्या १० सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपासून २६...