Sunday, May 5, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार तालुक्यातील सहा लोकनियुक्त सरपंच बिनविरोध

नंदुरबार तालुक्यातील सहा लोकनियुक्त सरपंच बिनविरोध

नंदुरबार Nandurbar | प्रतिनिधी

तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) निवडणुकीसाठी (election) आज उमेदवारी अर्ज (Application for candidacy) माघारीच्या (retreat) दिवशी सरपंच पदासाठी ८९ तर सदस्य पदासाठी २७३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे सहा सरपंच बिनविरोध (Six Sarpanchs unopposed) झाले असून ६१५ जागांसाठी ११८६ तर लोकनियुक्त सरपंच (Sarpanch) पदासाठी २१९ जण रिंगणात (arena) आहेत.

- Advertisement -

तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती माघारीअंती सहा ग्रामपंचायतींमध्ये सहा लोकनियुक्त सरपंच बिनविरोध झाले आहेत. ३२ ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी सरळ लढत रंगणार आहे. माघारीअंती २५७ जणांनी माघार घेतल्याने ६१५ सदस्यांच्या जागांसाठी ११८६ उमेदवार रिंगणात आहेत तर ६९ सरपंचांसाठी २१९ जण रिंगणात आहेत. लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकूण ९३ जणांनी माघार घेतल्याने २१९ जण रिंगणात आहेत.

सहा सरपंच बिनविरोध

माघारीअंती ७५ पैकी सहा ग्रामपंचायतींमधील लोकनियुक्त सरपंच बिनविरोध झाले आहेत. यात सुतारे, भवानीपाडा, देवपूर, नटावद, पथराई, वरुळ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या