Friday, May 3, 2024
Homeजळगावमहिलेवर चाकू हल्ला करणार्‍यास सहा महिन्यांची शिक्षा

महिलेवर चाकू हल्ला करणार्‍यास सहा महिन्यांची शिक्षा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील एमआयडीसी (MIDC) परिसरात राहणार्‍या महिलेवर (woman) चाकूहल्ला (knife attack)करून जखमी करणार्‍या सिताराम अभिमन कोळी (वय-46) रा. डांभुर्णी ता. यावल याला जिल्हा न्यायालयाने (District Court) 6 महिन्याची सश्रम कारावाची (6 months of rigorous imprisonment) शिक्षा (punishment) सोमवारी सुनावली आहे.

- Advertisement -

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार दोन मित्र ठार

शहरातील एमआयडीसी परिसरात सुरेखा रवींद्र सोनवणे ही महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दि. 14 ऑक्टोबर 2015 रोजी रात्री 10 वाजता तिची दवाखान्यात मुलीला जेवणाचा डबा देण्यासाठी रिक्षाने जात असतांना एमआयडीसी परिसरात सिताराम अभिमन कोळी याने रस्ता अडवून रिक्षाचालकाच्या मानेवर चाकू ठेवला.

प्रियकराचा पतिवर हल्ला VISUAL STORY : ऋतुराजविषयी जरा स्पष्टच बोलली सायली संजीव

हे पाहून रिक्षाचालक हा रिक्षा सोडून पळून गेला. त्यानंतर सिताराम कोळी याने महिला सुरेखा सोनवणे यांच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा खटला जळगाव जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एस. सपाटणेकर यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. सरकार पक्षातर्फे एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले.

थरार : चालत्या कारने घेतला पेटआयुक्त आले अन् 15 मिनीटात झाले रवाना Photos # राज्य नाट्य स्पर्धा 2022 : भीम चळवळीचा नवा अध्याय ‘एक रोझ’

यात जखमी महिला, वैद्यकीय अधिकारी, तपासाधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने सिताराम अभिमन कोळी याला दोषी ठरवत 6 महिन्याचा सश्रम कारावास आणि 5 हजार रूपयांचा दंड आणि दंड न भरल्यास 3 महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. प्रदीप महाजन यांनी प्रभावी युक्तिवाद केला. पैरवी अधिकारी ताराचंद जावडे आणि एमआयडीसी केस वॉच श्री बर्गे यांनी सहकार्य केले.

Photos #महापालिकेची अतिक्रमणांवर धडक कारवाई

- Advertisment -

ताज्या बातम्या