Sunday, May 19, 2024
Homeनंदुरबारबोरद येथे अज्ञाताकडून पपईच्या वृक्षांची कत्तल

बोरद येथे अज्ञाताकडून पपईच्या वृक्षांची कत्तल

बोरद | वार्ताहर- BORAD

बोरद येथे एका शेतकर्‍याच्या शेतात (farmer’s field) अज्ञात माथेफिरुने (unknown persons) सुमारे ३५ पपईच्या वृक्षांची कत्तल (papaya trees) केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

- Advertisement -

दि.२९ ऑगस्ट २०२२ रोजी बोरद येथील शेतकरी गणेश पुना पाटील हे आपल्या सर्व्हे नंबर १५७/१ या शेतात नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजता गेले असता आपल्या नित्य सवयी प्रमाणे शेतात लागवड केलेल्या पपईच्या बागाची पाहणी करत होते.

त्यावेळी शेतातील मागच्या बाजूला असलेल्या बागेतील साधारणतः ३० ते ३५ पपईच्या झाडांची देठापासून अज्ञात माथे फिरूने कत्तल केल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा प्रकार त्या ठिकाणी पाहून ते हादरून गेले.

मोठ्या कष्टाने त्यांनी पाच एकर पाच गुंठे या क्षेत्रामध्ये गेल्या मे महिन्यात पपईच्या रोपांची लागवड केली आहे. ही रोपे पाच महिन्यांची झालेली आहेत. ह्या रोपांना स्वतःच्या लहान मुलाप्रमाणे आतापर्यंत जपले आहे. परंतू त्यातील काही रोपांची झालेली अवस्था पाहून शेतातच त्यांना रडू कोसळले.

त्यांनी गावातील लोकप्रतिनिधी यांना घडलेल्या घटनेबाबत सांगितले व पत्रकारांना माहिती दिली.त्याचबरोबर शेतातील रोपांची परिस्थिती ही दाखवली. याबाबत गणेश पाटील यांनी तळोदा पोलीस स्टेशनला घडलेल्या घटनेबाबत तक्रारी अर्ज दाखल केला.

या अर्जाची दखल घेत पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे यांनी बोरद दुरक्षेत्राच्या कर्मचार्‍यांना घडलेल्या घटनेची पाहणी करून चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, गेल्या २ वर्षांपूर्वी अशाच घटना शहादा तालुक्यातील म्हसावद परिसरात घडल्या आहेत. अज्ञात माथेफिरूकडून अनेक शेतकर्‍यांच्या शेतात असलेल्या पपईच्या झाडांची नासधूस करण्यात आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या