Friday, May 3, 2024
Homeजळगावकत्तलखान्यात जाणार्‍या वाहनाचा पाठलाग : १३ गुरांची सुटका

कत्तलखान्यात जाणार्‍या वाहनाचा पाठलाग : १३ गुरांची सुटका

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी-

तालुक्यातील बिलाखेड पायपास जवळून रात्रीच्या सुमारास गोवंशाने (cattle) भरलेले वाहन (vehicle)मनमाड नांदगांव चाळीसगांव मार्गाने मालेगावच्या कत्तखान्यात (Slaughterhouse) नेली जात असल्याची माहिती अग्निवीर हिंदू संघटनेच्या महाराष्ट्राच्या पदाधिकार्‍यांना मिळाले नंतर गोवंश वाहतूक करणार्‍या वाहनाचा पाठलाग करत ते अडवून शहर पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना पहाटे पाच वाजेच्या सूमारास घडली आहे, या वाहनातून तेरा गोवंश गुरांचा सुटका करण्यात आली व चालकालाही ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

चाळीसगाव तालुक्यात भाजपाची मुसंडीरावेर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का !

काल रात्री गोरक्षा समितीचे मच्छिद्र गोविंद शिर्के यांना मिळालेल्या माहिती नंतर त्यांच्यासह भरत सुधाकर सूर्यवंशी आणि विलास देविदास जगताप आदींनी मनमाड नादंगाव चाळीसगांव मार्गे गोवंश घेऊन जाणारी पिकअप (क्रमांक एमएच ५० ५१६२) वाहनाचा रात्री साडेतीन वाजेपासून नादंगाव तालुक्यातील जळगांव चोंडी गावापासून पाठलाग टाटा सुमोने पाठलाग केला. गोवंश घेऊन जाणारे वाहन चाळीसगांव बायपास मार्गे मालेगाव कडे कत्तलखान्याकडे वळणार होते. त्याआधीचं चाळीसगांव तालुक्यातील बिलाखेड जवळील टोल नाक्यावर हे वाहन अडविण्यात आले.

धरणगाव तालुक्यातील ७ ग्रामपंचायतीचे निवडणूक निकाल घोषित पारोळा तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींची धुरा बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या हाती… VISUAL STORY : स्व़. सुशांतसिंहच्या EX- गर्ल फ्रेंड चा हा लुक करेल तुम्हालाही घायाळ

या पदाधिकार्यांनी शहर पोलिस स्टेशनला फोन वरून माहिती दिली. या नाटयात एक अन्य इसम पळवून जाण्यात यशस्वी झाला. तर शेख शोऐब इलियास वय २३ रा.मालेगाव यास पोलिसांनी ताब्यात घेतले. या वाहनात तेरा गोवंश जातीचे जनावरे पोलिसांना आढळून आली. पकडण्यात आलेल्या गोवंशात १ ते २ वर्षांच्या आतील वासर्‍यांचा समावेश आहे. पळून गेलेला इसम सम्मु (पूर्ण माहित नाही)रा.मालेगाव याने ही जनावरे सुरगाणा येथून आणली असल्याचे अधिक चौकशीतून सांगण्यात आले.

याप्रकरणी पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर ढिकले, पो.कॉ.ज्ञानेश्वर गिते, पो ना.भूषण पाटील, पो.ना.राहुल सोनवणे. पो.कॉ.विजय पाटील या पथकाने पहाटे सव्वा पाच सुमारास टेाल नाक्यावर ही कारवाई केली.

VISUAL STORY :सगळे विचारत आहेत…विचार केला सांगूनच टाकू…गुरुवारपर्यंत काय ते कळ काढा

पुष्पा स्टाईल गुरांची वाहतूक

हिंदू संघटनेच्या महाराष्ट्राच्या पदाधिकार्‍यांनी गोवंश वाहतूक करणार्‍या वाहनाचा पाठलाग करत ते अडवून पोलिसांच्या स्वाधिन केले. वाहनांची तपासणी केली असता, पोलिसांना गुगारा देण्यासाठी पुष्पा चित्रपटाप्रमाणे वाहनाच्या पाठीमागील भागात थर्माकॉलने भरलेले पोते लटकवण्यात आलेले होेते. आणि त्यांच्या खाली १३ गुरांचे पाय व मान निर्दयीपणे बांधण्यात आली होती. पोलिसांनी पोते बाजुला करुन पाहीले असता, त्यांनी लागलीच गुरांची सुटका केली आणि गोशाळेत रवाना केल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या