झोप ही प्रत्येकालाच अत्यंत प्रिय गोष्ट असते पुरेशी व गाढ झोप ही उत्तम आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असल्याने अलीकडच्या संशोधनातून असे आढळले आहे की जितकी जास्त झोप आणि विश्रांती तितके आरोग्य चांगले राहते. ज्योतिष शास्त्राचा विचार करता राशीनुसार प्रत्येक व्यक्तीची झोप आणि तिची गरज वेगवेगळी असते…
मेष राशी – मेष राशीच्या व्यक्तींना थंड व आरामदायी खोलीमध्ये शांत ठिकाणी झोपणे चांगले वाटते. या व्यक्तींची झोप उत्तम असते त्यांना कोणी उठवणार नसेल तर ते अतिशय गाढ व शांत झोप घेतात. मेष राशीच्या व्यक्तींना सहा ते आठ तासांची झोप पुरेशी असते
वृषभ राशी – वृषभ राशीच्या व्यक्तींनी आपले सौंदर्य व तजेलदारपणा टिकवण्यासाठी अतिशय स्वच्छ ठिकाणी नरम उशी व स्वच्छ बेडवर झोपावे या राशीच्या व्यक्तींनी शक्य होईल तितके झोपावे.
मिथुन राशी – मिथुन राशीच्या व्यक्तींची झोप अतिशय अस्थिर व अशांत असते. मिथुन राशीच्या व्यक्ती जर शांत झोपायचे असेल तर त्यांनी आपले सर्व सोशल मीडिया कॉन्टॅक्ट बंद करून झोपावे यांनी किमान दोन ते जास्तीत जास्त बारा तास झोप घ्यावी.
कर्क राशी – कर्क राशीच्या व्यक्तींना निद्रानाश किंवा अति झोपेचा त्रास असतो. या व्यक्तींना नवीन ठिकाणी किंवा प्रवासाच्या मध्ये झोप येत नाही कर्क राशीच्या व्यक्तींना किमान दहा तासाच्या गाढ झोपेची नितांत गरज असते.
सिंह राशी – सिंह राशीच्या व्यक्तीने झोपी जाण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या सर्व गोष्टी विसरून शांत झोपण्याचा प्रयत्न करावा. यामुळे त्या व्यक्तींना आरामदायी शांत झोप लागेल सुरक्षेची भावना निर्माण होईल. सिंह राशीच्या व्यक्तींना सात तासाची झोप पुरेशी आहे
कन्या राशी – कन्या राशीच्या व्यक्ती झोपी जाताना देखील खूप विचार काळजी करतात तसेच झोपताना पुढील योजना करायची सवय असते यांनी भविष्य काळाबद्दल चिंता किंवा भूतकाळातील घटनांचा विचार न करता शांत झोपण्याचा प्रयत्न करावा
तूळ राशी – तूळ राशीच्या व्यक्तींना उत्तम आरोग्य आणि झोपेसाठी चांगले व आरामदायी वातावरण गरजेचे असते. यांना किमान आठ तासांची झोप आवश्यक असते
वृश्चिक राशी – वृश्चिक राशीच्या व्यक्तींना संपूर्ण रात्र वाचनात किंवा काम करीत व्यतीत करण्याची सवय असते त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. यांना दोन ते तीन तासाची झोप देखील पुरेशी होते.
धनु राशी – धनु राशीच्या व्यक्तींना प्रवासाची खूप आवड असते. त्यांना प्रवासाची संधी मिळाली नाही तर ते झोपेत अनेक ठिकाणी सैर करतात. धनु राशीच्या व्यक्तीने किमान पाच तास झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
मकर राशि – मकर राशीच्या व्यक्तींसाठी झोप हीदेखील नेहमीच्या कामांमधील एक गोष्ट असते. यांना दिवास्वप्न रंगवण्यासाठी पाच तास तर खर्या झोपेसाठी पाच तास अशी झोपेची गरज असते.
कुंभ राशी – कुंभ राशीच्या व्यक्ती दुसर्यांच्या मताबद्दल खूप विचार करणारे असल्याने या राशीच्या व्यक्ती झोपेपासून वंचित राहतात. सोशल मीडियापासून दूर राहून झोपण्याचा यांनी प्रयत्न करावा योग साधना करावी जास्त झोप घेण्याचा प्रयत्न करावा
मीन राशी – मीन राशीच्या व्यक्ती या खूप सृजनशील आणि झोपेत स्वप्ने पाहणारी असतात. या व्यक्ती आध्यात्मिक वृत्तीचे असून यांना विविध स्वप्नांचे विश्लेषण करण्याची कला अवगत असते. दिवसातील अठरा तास देखील मीन राशी