नाशिक । Nashik
- Advertisement -
शहरात स्मार्टसीटी व महाआयटी अंतर्गत एकाच वेळी विविध रस्त्यांचे खोदकाम करून कडेने ड्रेनेज, पाणी, नेटवर्क केबल टाकण्याचे काम सुरू आहे. प्रामुख्याने रामवाडी रोड, कलानगर रोड, गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्याल प्रवेशद्वार, त्र्यंबकरोड, कालिदास कला मंदिर रोड, गणेशवाडी, पंचवटी अशा विविध ठिकाणी एकाच वेळी ही कामे सुरू आहेत.
अनेक ठिकाणी केवळ रस्ते खोदून ठेवले आहेत, काही ठिकाणी अर्धी कामे झाली आहेत. यामुळे त्या त्या परिसरातील नागरीकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. ही कामे तात्काळ पुर्ण करून नागरीकांना दिलासा देण्याची मागणी नाशिककरांकडून होत आहे.
(व्हिडीओ स्टोरी : खंडू जगताप )