Sunday, May 19, 2024
Homeधुळेधुळे बाजार समिती निवडणूकीत इतके अर्ज वैध

धुळे बाजार समिती निवडणूकीत इतके अर्ज वैध

धुळे dhule । प्रतिनिधी

धुळे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या (Dhule Bazar Committee Election) निवडणूकीत अर्जांची छाननी करण्यात आली. या छाननीत 280 उमेदवारांचे अर्ज (applications) वैध (valid) ठरले तर 40 अर्ज अवैध ठरले आहेत.

- Advertisement -

बाजार समितीच्या 18 संचालकांच्या जागांसाठी 28 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी 3 एप्रिलपर्यंत 320 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. छाननीअंती 280 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. त्यात सेवा सहकारी सोसायटीच्या सर्वसाधारण गटाचे 110, महिला राखीवचे 21, इतर मागासवर्गीयांचे 29, विमुक्त जाती, जमातीचे 28 अर्ज वैध ठरले. तर ग्रामपंचायत गटात सर्वसाधारण गटाचे 54, अनुसूचित जाती, जमातीचे 13, आर्थिक दुर्बल घटकाचे सात, तर व्यापारी व अडत गटाचे 11 आणि हमाल, तोलारी गटात सात अर्ज वैध ठरले.

दोंंडाईचा बाजार समिती

दोंडाईचा कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत छाननीअंती पंचायत समिती व कृउबा समितीचे माजी सभापती दिलीप संतोष पाटील यांनी एकच सूचक दिल्याने त्यांचे दोन्ही अर्ज बाद करण्यात आले. पंचायत समितीच्या माजी सभापती सुवर्णा प्रकाश पाटील यांचाही अर्ज बाद झाला. सुनिल लांडगे, रेखाबाई पवार, येसूबाई पवार, सुमनबाई फुलपगारे, सोनी ईशी, योगेंद्र घरटे यांचेही नामंजूर झाले आहेत.

साक्री दोन अर्ज बाद

साक्री कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी 131 अर्ज दाखल झाले. छाननीअंती दोन अर्ज बाद झाले आहेत. त्यात भाईदास चव्हाण आणि सुनंदा पगारे या दोघांचा अर्ज बाद झाला.

शिरपूरात एकही अर्ज बाद नाही

शिरपूर कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात एकही अर्ज बाद झाला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या