Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedसामाजिक भान : नासाडी फक्त अन्नाची नसते

सामाजिक भान : नासाडी फक्त अन्नाची नसते

अन्न नासाडी ही आपल्याकडे खूप मोठी समस्या आहे. आपल्या प्रत्येकाच्या चुकीच्या सवयीमुळे नैसर्गिक स्त्रोतांवर अतिरिक्त ताण येत आहे. भविष्यात ही समस्या जटील बनणार आहे. अन्नाची नासाडी म्हणजे फक्त अन्न वाया घालवणे नव्हे तर धान्य, फळ-भाज्या पिकवण्यासाठी लागलेली मजूरी, श्रम, गुंतवणूक आणि स्त्रोतांचे नुकसान आहे. थोडक्यात काय तर अन्न वाया घालवणे म्हणजे पर्यावरणाचेही अपरिमित नुकसान आहे. या बेजबाबदारपणामुळे आपण ग्रीन हाऊस उत्सर्जन आणि वातावरण बदलासाठी जबाबदार ठरतो. हे थांबवण्यासाठी गरजेपेक्षा जास्तीचा म्हणजे अन्नाचा अनावश्यक साठा वा अतिरिक्त अन्न विकत घेणे बंद करायला हवे.

गरीब देशात पुरेसे अन्न नाही

- Advertisement -

जगात अनेक गरीब देश आहेत. जिथल्या लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही. ती मोठ्या कष्टाने जगतात. जगात भूकबळींची आकडेवारी, कुपोषण आणि पर्यावरणातील बदल यावरूनच ‘ अन्न बचत ’ किती आवश्यक आहे हे सहज समजेल.

अन्न नासाडी थांबवण्याचे तीन सोपे उपाय

अन्नाची नासाडी हा फक्त सामाजिक प्रश्न नाही तर पर्यावरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अन्नाची नासाडी रोखण्यासाठी ठोस पाऊल उचलले गेलेच पाहिजे. गरज आहे तितकेच अन्न शिजवले गेले पाहिजे. ‘रियुज’ म्हणजे वस्तू दीर्घकाळ वापरा. ‘रिसायकलिंग’ म्हणजे जुन्या वस्तूला नव्या वस्तू तयार करण्यासाठी वापर करा. या तीन तत्वावर अन्नाची नासाडी थांबून प्रत्येकापर्यंत अन्न पुरेशा प्रमाणात पोहोचू शकेल. कारण अन्नाची बचत ही कुणा एकाची जबाबदारी नाही तर प्रत्येकाने या कामात सहभागी व्हायला हवे.

विवाहसोहळ्यांमध्ये अन्नाची नासाडी

आपल्या विवाहसोहळ्यांमध्ये किंवा उत्सवांमध्ये अन्नाची नासाडी मोठ्या प्रमाणात होते. त्यातून येणार्‍या दुर्गंधीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

अन्न वाया जाण्याचा परिणाम

सध्याच्या काळात, अन्न वाया घालवणे अनेक अडचणींना निमंत्रण देते. जैवविविधतेप्रमाणेच अन्न, पाण्याचा नाश, भूमीवर आणि वातावरणावर नकारात्मक परिणाम होतो. जगाच्या असंख्य लोकांच्या खालावत्या आरोग्यासाठी अन्नाची नासाडी जबाबदार आहे. भाज्या आणि सेंद्रिय उत्पादने घरी नीट ठेवा. उर्वरित अन्न ठेवण्यासाठी योग्य भांडी वापरा. नियमितपणे ओलसरपणामुळे खराब झालेल्या धान्यांची तपासणी करणे सुरू ठेवा. योग्य वेळी त्यांना उन्हात वाळवा.

अन्नाचा अपव्यय टाळण्याचे मार्ग

स्त्रिया अन्न वाया न घालविण्याकरिता खूप काही करू शकतात.विशेषतः मुलांमध्ये प्लेटमध्ये जेवण देताना थोडे थोडे दिल्यास मोठ्या प्रमाणात अन्नाची बचत करता येऊ शकते.आपल्याला आवश्यक तेवढे अन्न शिजवा आपल्या कुटुंबाला लागते तेवढेच अन्न शिजवा. यामुळे रोज शिळे अन्न टाकावे लागणार नाही.

पॅकिंग केलेले अन्न कधीपर्यंत खाऊ शकतो

पॅकिंग केलेल्या वस्तूच्या तारखा लक्षात ठेवा. शेवटची तारीख संपून जायच्या आधी अन्नाचे सेवन करा.अन्न नीट पॅक करून ठेवा.

आपल्याला आवश्यक तेवढेच अन्न घ्या

आपण जेवढे खाणार आहे तेवढेच जेवण घ्या. आणि जेवण शिल्लक असेल ते गरजूला ते देऊन टाका. असे राहिलेले अन्न कचर्‍यात टाकण्यापेक्षा कोणाला दिलेले कधीही चांगलेच आहे.

अन्नाची नासाडी थांबवा

अन्न उत्पादनामध्ये शेतकर्‍याचा मोलाचा वाटा असतो. गहू, ज्वारी, तांदूळ, वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, फळे, भाज्या हे सर्व शेतामध्ये पिकवले जाते आणि आपण या सर्व घटकांचा वापर करूनच वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवतो. ही पिके घेण्यासाठी शेतकर्‍यांना अमाप कष्ट करावे लागलेले असतात. कोरड्या दुष्काळाचा तसेच अतिपावासाचा सामना करून पीक चांगले आणण्याचा प्रयत्न करतात. ते बाजारामध्ये विकतात आणि ते इतर लोक बाजारामधून विकत घेऊन आपल्या अन्नाच्या गरजा भागवत असतात. म्हणून जगातील प्रत्येक मानवाने अन्न वाचवले पाहिजे. त्याची नासाडी नको. अन्नाची नासाडी ही बहुतेकदा मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये होते. कार्यक्रमाच्या आयोजकांनी लागेल तेवढेच अन्न बनवले पाहिजे आणि अन्नाची नासाडी थांबवली पाहिजे. ज्या लोकांना पुरेपूर अन्न मिळते त्यांना अन्नाची किंमत नसते. म्हणून ते ताटात उष्टे टाकतात. अन्न आवडले नाही तर तसेच सोडतात. त्यामुळे अन्नाची नासाडी होते.

अन्न म्हणजे काय आहे आणि अन्नाची किंमत ज्यांना माहित आहे, तेच जाणू शकतात जे अन्नाशिवाय एक एक दिवस राहतात तसेच ज्यांना रोज अपुरे जेवण खाऊन दिवस काढावे लागते, ज्यांना उपाशी राहावे लागते.

– विजय गिते.

- Advertisment -

ताज्या बातम्या