Tuesday, January 6, 2026
Homeनगरमुलींची संख्या कमी असल्याने सामाजिक प्रश्न निर्माण

मुलींची संख्या कमी असल्याने सामाजिक प्रश्न निर्माण

महाराष्ट्रातील सर्वच वयोगटातील मुलींच्या जन्मदराला फटका

संगमनेर | Sangamner

देशामध्ये मुलींची संख्या सातत्याने कमी होत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात मुलींची संख्या घटल्यामुळे लग्नासाठी मुली मिळत नसल्याचे चित्र आहे. यातून अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत शासनाने त्यावर नियंत्रणासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत, मात्र तरीसुद्धा या प्रयत्नाला पुरेसे यश येताना दिसत नाही असेच म्हणावे लागेल. भारत सरकारच्या यू-डायस प्लस अहवालामध्ये प्रोजेक्टेड पॉप्युलेशन म्हणजे अंदाजित लोकसंख्या दर्शवण्यात आली आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर फरक दिसत आहेत. त्यामुळे वर्तमानातील वास्तव चित्र भविष्यातही कायम राहणार असाच अंदाज आहे.

- Advertisement -

यू-डायस प्लस अहवालामध्ये विविध स्तरातील लोकसंख्या दर्शवण्यात आली आहे. त्यातील तीन ते सात वयोगटातील महाराष्ट्रातील मुलांची संख्या 51 लाख 914 मुले, तर 44 लाख 47 हजार 638 मुली आहेत. या स्तरावर 6 लाख 53 हजार 276 मुलांची संख्या अधिक आहेत. वयोगट आठ ते दहा यामध्ये देखील 28 लाख 79 हजार 788 मुले, तर 24 लाख 99 हजार 930 मुले नोंदवले आहेत. या स्तरावर 3 लाख 19 हजार 858 मुलांची संख्या अधिक आहे. वयोगट 11 ते 13 या स्तराचा विचार करता 30 लाख 856 मुले, तर 26 लाख 33 हजार 425 मुली आहेत. या स्तरावर 3 लाख 67 हजार 431 मुलांची संख्या अधिक आहेत. 14 ते 17 वयोगटातील मुलांची संख्या 42 लाख 1720 इतकी आहे, तर मुलींची संख्या 26 लाख 24 हजार 639 इतकी आहे.

YouTube video player

15 लाख 77 हजार 81 मुलींची संख्या कमी आहे. त्याचबरोबर अनुसूचित जातीच्या लोकसंख्येचा अंदाज व्यक्त करताना देखील मुलींची संख्या घटत असल्याचे चित्र आहे. वय वर्ष तीन ते सात या वयोगटातील मुलांची संख्या 6 लाख 16 हजार 03, मुलींची संख्या 5 लाख 57 हजार 922 इतकी आहे. याचा अर्थ 58 हजार 81 मुलींची संख्या कमी आहे. आठ ते दहा वयोगटातील मुलांची संख्या 3 लाख 40 हजार 772 इतकी तर मुलींची संख्या 3 लाख 7 हजार 755 इतकी आहे. या वयोगटातही 33 हजार 17 मुलींची संख्या कमी आहे. वयोगट 11 ते 13 या स्तरावर 3 लाख 65 लाख 466 मुले, 3 लाख 32 हजार 426 मुली दर्शवण्यात आलेल्या आहेत. या स्तरावर 33 हजार 40 ने मुलींची संख्या कमी आहे. त्याचबरोबर वयोगट 14 ते 17 मध्ये 5 लाख 17 हजार 689 मुले, तर 4 लाख 63 हजार 256 मुली दर्शवण्यात आल्या आहे. या स्तरावर 54 हजार 433 ने मुलींची संख्या कमी असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे.

अनुसूचित जमातीचा विचार करता तीन ते सात वयोगटामध्ये 5 लाख 99 हजार 488 मुले व 5 लाख 58 हजार 315 मुली दर्शविण्यात आलेल्या असून येथील फरक 41 हजार 173 इतका आहे. वयोगट आठ ते दहामध्ये 3 लाख 38 हजार 891 मुले व 3 लाख 11 हजार 428 मुली दर्शवण्यात आलेल्या आहेत. या स्तरावरील फरकही 27 हजार 463 इतका आहे. वयोगट 11 ते 13 मध्ये 3 लाख 47 हजार 653 मुले व 3 लाख 14 हजार 620 मुली दिसत आहे. या गटाचा विचार करता 30 हजार ते 30 ने मुलींची संख्या कमी असल्याचे चित्र आहे. वयोगट 14 ते 17 चा विचार करता या स्तरावर 4 लाख 44 हजार 598 मुले, तर 4 लाख 1 हजार 928 मुली दर्शवण्यात आलेल्या आहे. येथील फरकही 42 हजार 670 इतका आहे. महाराष्ट्राचा विचार करता सर्वच वयोगटात आणि संवर्गात मुलींच्या जन्मदराला फटका बसणार असे दिसते आहे.

सर्वत्र समान अवस्था…
देशातील सर्वच राज्यांमध्ये मुलांची अंदाजित लोकसंख्या अधिक दर्शवण्यात आली आहे, तर मुलींची अंदाजित लोकसंख्या कमी दर्शवण्यात आली आहे. मध्य प्रदेशात काहीसे समाधानकारक चित्र दिसत आहे. तीन ते सात वयोगटात मुलींचे प्रमाण वाढलेले आहे. मात्र इतर वयोगटातील चित्र मात्र फारसे समाधानकारक नाही. देशातील सर्वच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये मुलींची संख्या कमी असल्याचे दिसत आहे. याचा अर्थ देशातील समाजमनाची मानसिकता सर्वत्र सारखीच आहे.

भविष्यात गंभीर परिस्थिती…
देशात भविष्यातील लोकसंख्येचा विचार करता मुलींची संख्या कमी असल्यामुळे अविवाहित मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता आहे. अविवाहित मुलांच्या मानसिकतेत त्यामुळे विपरीत परिणाम होऊ शकतो. नैराश्य आल्याने आत्महत्यासारखे मार्ग अनुसरला जाऊ शकतो. समाजामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढू शकते. सामाजिक स्वास्थ्य खराब होऊ शकते. बलात्कार, लैंगिक गुन्हे, अत्याचार यासारख्या प्रकारात वाढ होऊ शकते, असे सामाजिक शास्त्रज्ञांचे मत आहे. त्यामुळे वर्तमानातच या प्रश्नावर अधिक गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.

ताज्या बातम्या

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी अजितदादांना करून दिली 70 हजार कोटींच्या घोटाळ्याची...

0
मुंबई । Mumbai राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर येत असून,...