Sunday, February 15, 2026
HomeनगरAhilyanagar : सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी निलंबीत

Ahilyanagar : सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी निलंबीत

अहिल्यानगर | Ahilyanagar

नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस ठाणे हद्दीत दोनवेळा गोळीबारासह गंभीर गुन्हे वाढल्याने सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले की, सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी सोनई पोलीस ठाण्यात नेमणुकीस असताना त्यांना मागील सहा महिन्याच्या कालावधीत पोलीस ठाणे हद्दीतील दाखल झालेल्या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करण्याबाबत वेळोवेळी स्पष्ट सूचना देवूनही त्या सूचनांचे पालन केले नाही.

- Advertisement -

त्यामुळे सोनई पोलीस ठाणे हद्दीत गंभीर स्वरुपाचे अग्नीशस्त्रांसह खून, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांची खात्याअंतर्गत चौकशी सुरु करण्यात आली असून चौकशीवर विपरीत परिणाम होवू नये यासाठी शासन सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या चौकशीसाठी श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांची नियुक्ती केली असून चौकशी करुन ते अहवाल जिल्हा पोलीस अधिक्षकांना देणार आहेत.

YouTube video player

सोनई पोलीस ठाणे हद्दीत अंमळनेर येथे व त्यानंतर घोडेगाव येथे गोळीबाराच्या घटना घडल्या. घोडेगाव येथे एकाचा बळी गेला. त्यामुळे सोनई पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. आता सोनईत कर्तव्यकठोर अधिकार्‍याची नेमणूक करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

कर्जमाफी : जिल्हा बँकेच्या 2 लाख 66 हजार कर्जदार खातेदारांची माहिती...

0
अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे| Ahilyanagar राज्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच या शेतकर्‍यांना पुन्हा कर्जमाफी मागायला लागू नये, यासाठी दिर्घकालीन उपाययोजना देखील केल्या...