Monday, May 4, 2026
Homeक्राईमAhilyanagar : जामखेडमध्ये दूध भेसळीचा पर्दाफाश, राहुरी तालुक्यातील दोघे ताब्यात

Ahilyanagar : जामखेडमध्ये दूध भेसळीचा पर्दाफाश, राहुरी तालुक्यातील दोघे ताब्यात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जामखेड तालुक्यातील फक्राबाद परिसरात शनिवारी (दि.14) अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दूध भेसळीचा पर्दाफाश केला. याप्रकरणी राहुरी तालुक्यातील दोघांसह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिवनाथ लबडे यांनी स्वतंत्र पंचांसह फक्राबाद येथे तपासणी केली.

- Advertisement -

तपासणीदरम्यान वाहन क्रमांक एम.एच. 17 के. 7946 उभे आढळले. वाहनात एकूण दहा प्लास्टिक ड्रम आढळले, त्यापैकी सहा ड्रममध्ये पांढर्‍याा रंगाचे दुधासारखे द्रावण असल्याचे निदर्शनास आले. चौकशीत समीर कमरुद्दीन शेख (वय 30, रा. उंबरे, ता. राहुरी) आणि आफताब कलीम शेख (वय 28, रा. शुक्लेश्वर चौक, राहुरी) यांनी हे द्रावण दूधाची फॅट कृत्रिमरित्या वाढवण्यासाठी पराफिन तेल व इतर अज्ञात रसायन वापरून तयार केले असल्याचे सांगितले. त्यांनी हे द्रावण रामदास नवनाथ उबाळे (मु.पो. फक्राबाद, ता. जामखेड, व्यवसाय – दुध संकलन व पुरवठा) यांना पुरवठ्यासाठी आणले असल्याचे मान्य केले.

तपासणी दरम्यान द्रावणाचे दोन लिटर नमुने घेण्यात आले. तसेच घराच्या परिसरात पांढरट पिवळसर पावडर आणि दूध साठा आढळला. उबाळे यांनी सांगितले की, ही पावडर दुधातील घटक (एसएनएफ) वाढविण्यासाठी वापरली जात होती. बडे यांच्या तपासणीनंतर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 आणि अन्न सुरक्षा नियम 2011 चे उल्लंघन केले असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी तीन व्यक्तींविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

Rahuri Assembly By Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीची आज मतमोजणी

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Rahuri Assembly By Election) झालेल्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष आज होणार्‍या मतमोजणीकडे लागले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत...