Friday, May 3, 2024
Homeधुळेसोनगीरात दोन गटात सिने स्टाईल हाणामारी

सोनगीरात दोन गटात सिने स्टाईल हाणामारी

सोनगीर – Songir – वार्ताहर :

हळदीच्या कार्यक्रमात झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान येथील तरुणांच्या दोन गटात तुफान हाणामारीत झाले. आपापल्या गटाचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास तरुणांचे दोन गट लाठ्या-काठ्यासह एकमेकांवर चालून गेले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून हाणामारी करणार्‍या तरुणांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

- Advertisement -

दि. 18 रोजी रात्री येथील एका कुटुंबाकडे लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात किरकोळ वाद झाला. या वादाच्या निमित्ताने रात्री अकरा वाजेच्या सुमारास दोन गटातील तरुण लाठ्या-काठ्या व काही धारदार शस्त्रे घेऊन एकमेकांवर चालून गेले. एखाद्या चित्रपटातील हाणामारी प्रमाणे हे दृश्य होते. यावेळी दोन्ही गटातील तरुण एकमेकांना जोरात शिवीगाळ करत होते. याबाबत माहिती मिळताच सोनगीर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटातील तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. यावेळी दोन्ही गटातील कोणीही तक्रार द्यायला तयार नव्हते. यामुळे पोलिसांनी स्वतः घटनेची दखल घेऊन पोलीस कॉन्स्टेबल अतुल संजय निकम यांनी दोन्ही गटातील तरुण विरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यात भुर्‍या उर्फ सुनील माळी, गोपाल माळी, कन्हैयालाल चौधरी, सौरभ वाणी, भावेश वाणी, सोनू हैबत माळी, गोपाल उर्फ बाबरी माळी, पराग सोनार व इतर 35 ते 40 तरुणांविरोधात सार्वजनिक शांतता भंग करणे, हाणामारी करणे, आरडाओरड करणे, दहशत निर्माण करणे, जिल्हाधिकार्‍यांच्या कोविड-19 संदर्भातील आदेश भंग करणे यावरून भांदवि 269, 188, 323, 324, 504, 506, 143, 147, 148, 149 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1), (3) अन्वये सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या