Thursday, January 8, 2026
Homeक्राईमशेतातून 14 क्विंटल सोयबीनची चोरी

शेतातून 14 क्विंटल सोयबीनची चोरी

काढणीनंतर घातले होते वाळण्यासाठी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर तालुक्यातील तांदळी वडगाव शिवारातील शेतात वाळवण्यासाठी घातलेले 56 हजार रुपये किमतीचे 14 क्विंटल सोयबीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. सदरची घटना सोमवारी (7 ऑक्टोबर) सायंकाळी सात ते मंगळवारी (8 ऑक्टोबर) सकाळी सातच्या दरम्यान घडली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश लक्ष्मण सोनवणे (वय 54 रा. तांदळी वडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची तांदळी वडगाव शिवारात शेत जमीन आहे. त्यांनी यावर्षी शेतात सोयाबीन पेरले होते. दरम्यान सोयबीन काढणीसाठी आल्यानंतर त्यांनी ते काढून घेतले. काढलेले सोयबीन तेथील शेतात वाळवण्यासाठी घातले होते. सोनवणे यांनी सोमवारी सायंकाळी सात वाजता पाहिले असता शेतात सोयबीन होते.

YouTube video player

ते दुसर्‍या दिवशी मंगळवारी सकाळी सात वाजता शेतात आले असता त्यांना सोयबीन मिळून आले नाही. एकूण 56 हजार रुपये किमतीचे 14 क्विंटल सोयबीन अज्ञात चोरट्यांनी रात्रीतून चोरून नेले असल्याची फिर्याद नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार आर. व्ही. गांगर्डे करत आहेत.

ताज्या बातम्या

महेश

“तेव्हा मला मुंबईकर म्हणून लाज वाटते…”; महेश मांजरेकरांकडून खंत व्यक्त

0
मुंबई | Mumbaiमुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातले राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची...