नाशिक | प्रतिनिधी
नव वर्ष व नाताळ सणानिमित्ताने दूध व दुग्धजन्य पदार्थ व इतर अन्नपदार्थांतील भेसळ रोखणे व गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालयाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे, अशी माहिती नाशिक विभाग सह आयुक्त (अन्न) म. ना. चौधरी यांनी दिली.
या मोहिमेंतर्गत ११ डिसेंबर २०२४ रोजी निफाड तालुक्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रेते तसेच ३ दूध संकलन केंद्र यांची तपासणी करण्यात आली. तपासणीत १ खव्याचाच दुधाचे ६ नमुने घेण्यात आले असून, विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षाव मानके कायदा २००६ अन्वये पुढील कारवाई करण्यात येणार आहे. सदर कार्यवाही सहाय्यक आयुक्त दिनेश तांबोळी व सह आयुक्त मनीष सानप यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी, सुहास मंडलिक, संदीप तोरणे व गोपाळ कासार यांच्या पथकाकडून करण्यात आली.
तसासणी वेळी कायद्यानुसार परवाना, अन्न व्यवसायाच्या ठिकाणची जमीन, भिंती व परिसर आदींची साफसफाई, अन्न व्यवसायाच्या ठिकाणी संकलित केलेल्या दुधाच्या चाचण्या घेण्यात येतात किंवा कसे? तसेच दूध संकलनाचा आवश्यक लेखा जतन केला जातो किंवा कसे?, या ठिकाणी वापरण्यात येणारी उपकरणे यांचे कॅलिब्रेशन केले जाते का?. व्यवसायाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते का?, या ठिकाणी पेस्ट कंट्रोल केले आहे का? या महत्वाच्या बाबींची तपासणी केली जाते. ही मोहीम यापुढेही सुरू असणार असून अन्नपदार्थात भेसळ करताना आढळून आल्यास संबंधितावर कडक कार्यवाही करण्यात केली जाईल. नागरिकांनाही दूध भेसळीबाबत माहिती असल्यास त्यांनी एफएसएसएआय च्या संकेतस्थळावर तक्रार नोंदवण्याचे आवाहनही सह आयुक्त (अन्न) म.ना. चौधरी यांनी केले आहे.
Nashik News: शहरात अन्न औषध प्रशासनाची तपासणी मोहिम
नववर्ष आणि नाताळ सणानिमित्त खाद्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहिम