Thursday, May 2, 2024
Homeनाशिक११ वी प्रवेशासाठी शेवटची संधी

११ वी प्रवेशासाठी शेवटची संधी

नाशिक । Nashik

अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी तीन नियमित फेर्‍या पार पडल्यानंतरही ७० हजाराहून अधिक विद्यार्थी प्रवेशाविना आहेत. त्यामुळे त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश देऊन यंदाच्या वर्षाचा अभ्यासक्रम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी दोन विशेष प्रवेश प्रक्रिया फेर्‍या पार पडणार आहेत.

- Advertisement -

या विशेष प्रवेश प्रक्रिया फेरीसाठी आजपासून सुरूवात झाली आहे. यंदा सुरूवातीला करोना संकट आणि नंतर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने थांबलेली ११ वी ची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.

प्रवेश प्रकिया आयोजन

20 डिसेंबर 2020 – कॉलेजमधील रिक्त जागा जाहीर होतील.

20-22 डिसेंबर 2020 – विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जात बदल करून कॉलेजचा पसंतीक्रम बदलण्याची संधी

24 डिसेंबर 2020 – सकाळी 11 वाजता प्रवेश यादी जाहीर होणार

24-26 डिसेंबर 2020 – पहिल्या विशेष प्रवेश प्रक्रिया अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेण्याची संधी

27 डिसेंबर – उर्वरित रिक्त जागा जाहीर होतील.

यंदा वाणिज्य अर्थात कॉमर्स साठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली आहे. या शाखेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अधिक अर्ज दाखल झाल्याची माहिती आहे. दरम्यान कॅप कमिटीकडून विद्यार्थ्यांना त्यांचे अ‍ॅडशिमन रद्द करण्याची ही शेवटची संधी असल्याचं सांगण्यात आले आहे. यानंतर अ‍ॅडमिशन रद्द केले जाऊ शकत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या