Sunday, May 5, 2024
Homeदेश विदेशमोठी बातमी! मोदी सरकारने बोलवलं संसदेचं विशेष अधिवेशन; नेमकं कारण काय?

मोठी बातमी! मोदी सरकारने बोलवलं संसदेचं विशेष अधिवेशन; नेमकं कारण काय?

नवी दिल्ली | New Delhi

नुकतेच काही दिवसांपूर्वी संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) संपन्न झाले आहे. मात्र, त्यानंतर आता हिवाळी अधिवेशनापूर्वीच (Winter Session) पुन्हा एकदा मोदी सरकारने पाच दिवसांचे संसदेचे विशेष अधिवेशन (Special Session) बोलावले आहे. यासंदर्भातील माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Minister Prahlad Joshi) यांनी ट्विट करत दिली आहे…

- Advertisement -

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; आता सर्वोच्च न्यायालयात ‘या’ तारखेला होणार सुनावणी

याबाबत अधिक माहिती अशी की, १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे (Parliament) हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून या अधिवेशनात १० विधयेकं मांडली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या अधिवेशनात १० विधयेकांबरोबरच काही महत्वाच्या विधेयकांना देखील मंजूरी देण्यात येण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वीच संसदेचे हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Bacchu Kadu : सचिन तेंडुलकरांच्या घराबाहेर बच्चू कडूंचे कार्यकर्त्यांसह आंदोलन; पोलिसांनी घेतले ताब्यात

दरम्यान, संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलै ते ११ ऑगस्टपर्यंत चालले होतं. या अधिवेशनात मणिपूरमधील हिंसाचारावर (Manipur Violence) दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला होता. पंतप्रधान मोदींनी मणिपूरमधील हिंसाचारासंदर्भात उत्तर द्यावे यासाठी विरोधकांनी मोदी सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला होता. त्यामुळे आता या विशेष अधिवेशनात मोदी सरकार नेमके कोणते मोठे निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Video : तब्बल १३ वर्षांनंतर मुंडे बंधु-भगिनींचं एकत्रित रक्षाबंधन

- Advertisment -

ताज्या बातम्या