Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik Accident News : भरधाव कार पुलाचा कथडा तोडून गोदावरी नदीपात्रात उलटली

Nashik Accident News : भरधाव कार पुलाचा कथडा तोडून गोदावरी नदीपात्रात उलटली

एक ठार, दोघे जखमी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येथील गंगापूर धरण परिसरातील (Gangapur Dam Area) महादेवपूर गावाजवळील पुलावरुन जाणारी भरधाव कार नदीच्या पूलावरील (Bridge) कथडे तोडून थेट नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली. या अपघातात चालक जागीच ठार झाला असून दोघे जण जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात (Accident) शुक्रवारी (दि. ५) गंगापूर राेडवरील हाॅटेल गंमत जंमतच्या पुढील नदीपात्राजवळ घडला. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : जिल्ह्यात महिनाभरात ‘इतके’ टक्के रेशनकार्ड ई-केवायसी पूर्ण

याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन बापू कापडणीस (३५, रा. चांदशी) असे मृत कारचालकाचे नाव आहे. तर, किरण संजय कदम (३२), योगेश पानसरे (३४, दोघे रा. चांदशी) अशी कारमधील जखमींची नावे आहेत. शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नितीन कापडणीस हा त्याच्या कारमधून किरण व योगेश या दोघा मित्रांसमवेत दुगावकडून गंगापूर गावाच्या दिशेने येत होता. दुगावकडून गंगापूरकडे (Gangapur) येताना हॉटेल गंमत-जंमतच्या अलिकडे गोदावरी नदीवर पुल आहे. तसेच पुलाकडे येताना उतारही आहे.

हे देखील वाचा : Nashik News : पंचवटी एक्सप्रेसची अचानक कपलिंग तुटली अन्…

या उतारावरून कापडणीस यांची कार भरधाव वेगात येत असतानाच समोरून आलेल्या वाहनाच्या अप्पर डिप्परचा प्रखर लाईट कापडणीस याच्या डोळ्यावर आला. त्यामुळे काही क्षणात कापडणीस यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार काही कळायच्या पुलाचा कथडा तोडून नदीपात्रामध्ये पलटी झाली. नदीला (River) पाणी नसल्याने कार खडकावर जाऊन आदळली. त्यात कापडणीस यांस गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. तर कारमधील दोघे किरण व योगेश हे जखमी झाले.

हे देखील वाचा : रवींद्र वायकरांना ‘त्या’ प्रकरणात मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट; सर्व गुन्हे मागे

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आमले हे पथकासह घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने कारमधील जखमींना बाहेर काढण्यात आले. त्यावेळी जखमींनी अपघाताची माहिती दिली. मयत कापडणीस यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय सूत्रांनी तपासून मृत घोषित केले. नाशिक तालुका पोलीसात (Nashik Taluka Police) नोंद करण्यात आली आहे.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

 

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या